Posts

Showing posts with the label कविता

तुझी कुशी .......

  जेव्हा जेव्हा तुझ्या कुशीत येऊन तुझ्या  हृदयाचे ठोके ऐकत असते त्यावेळी ते मला जगातले सर्वात सुंदर गीत वाटते मग मी हळूच तुझ्या डोळ्यात  बघून ते वाचण्याचा प्रयत्न करते नी कसली जादू त्यातही मला  माझेच प्रतिबिंब दिसून जाते आणि नकळत हळूच माझ्या गालांवर लाली चढून मी लाजून जाते याची मात्र तुला जरा ही  खबर नसते..... 

मैत्रीचे प्रेम...

मैत्रीचे प्रेम हे कधी पलीकडे गेले याचे भान हि मला राहिले नव्हते  मात्र मला हे कधीच पटवून देता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही अश्रू तुझ्या डोळ्यात असायचे  मात्र मन माझे हळवे व्हायचे  झालेला हळवेपणा मला कधी दाखवताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  कित्येक आठवणी साठवून ठेवल्या ,  प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या मात्र त्या कधी तुझ्या समोर मांडता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही बघताच तुला मन फुलून यायचं , सगळी कडे  आपला सुवास पसरून बेभान करायचं  त्या फुलांचा सुगंध तुला देताच आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  नकळत तुझ्याशी तासंतास बोलायची ,  दाटलेल्या भावनांशी झुंज माझी चालायची  ओठांवरचे शब्द तुझ्या कानापर्यंत पोहचवता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  होताच तुझा स्पर्श मला , थोडी लाजून जायची मी शहारलेल्या हात मग अलगद तुझ्या कडे सरकवयाची बिनधास्त तुझ्या मिठीत यायला मला कधी जमले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही

काय असत प्रेम ........

काय असत प्रेम ? नकळत कोणाला तरी आपले हृदय देऊन स्वतःला विसरणे  । चेहऱ्यावरील हावभाव लपवत स्वतःचे एक जग तयार करणे ।। म्हणजे प्रेम होय........ काय असत प्रेम? त्याला भेटण्यासाठी ची उत्कटता त्याला न सांगता अनुभावावी लागणे । त्याच्याच विचारात हळू हळू रात्री मात्र एका कड्यावरून दुसरी बदलणे  ।। म्हणजे प्रेम होय....... काय असत प्रेम ? कदाचित तो नसेल करत प्रेम माझ्यावर ह्या भावनांशी झुंज करणे  । होकार की नकार असेल ह्याच विचारांची डोक्यात गुंतागुंत होणे  ।। म्हणजे प्रेम होय........ काय असत प्रेम ? भूतकाळाशी नातं न ठेवता वर्तमान घालवण्यासाठी झालेली ती तळमळ । भाविष्यकाळा साठी स्वतःवर क्षणर्थात पाडलेली ती भुरळ ।। म्हणजे प्रेम होय .........

माझा बाबा ......

पहिले पाऊल टाकताना धडपडलेली ती मी त्याच वेळी चुकलेला त्यांच्या काळजाचा ठोका यांच्यातले नाते आज कळाले मला सायकलसाठी केलेला हट्टहास आठवतो मला पण स्पष्ट नकार देणारे माझे क्रुर बाबा आठवते मला सायकल न देण्यामागचे कारण आज उमजले मला निश्चय केला होता मनात ,नाही करणार हट्ट परत मात्र दुसरीकडे माझ्या छकुली चे प्रत्येक हट्ट पूर्ण करणारा ,खंबीर क्रुर बाबा आज समजला मला लहानाचे मोठे होत गेले मी नि ते तरुणाचे वृद्ध मी माझ्यात विश्वात मग्न होत गेले मात्र माझे क्रूर बाबा कधी अस्पष्ट झाला कळलंच नाही मला पॉकिटमनी  साठी वाद घालून रागात निघून जाणारी मी आणि माझ्याच लग्नात पैश्यांची  जमवा जमवी करणारा माझा क्रुर बाबा आज माप ओलांडताना कळाला मला

बोलके मन .....

बोलके व्हावे मन हे  माझे सांगावे प्रेम तुझे,  नयनी रचले स्वप्न आज   होईल पूर्ण ते  भान माझे मला ना  आता कसली बेचैन मनाला , ओठ आतुरलेत सांगावया कहाणी आपली ती दुनियेला  हळूच नकळत येतोस ध्यानी का रे हा लपंडाव , हात माझे बोलवती जवळी मिठीत मला घेशील का ? होऊन मी बेधुंद आज प्रेम ते आपुले जानियेले  ओलांडते उंबरठा तुझ्या  मनीचा ,साथ तू देशील का ? नको आता दुरावा  आपल्यात नको ती शांतता  सात जन्मी तू माझा, वचन बद्ध करशील का?  हरवून गेली तुझ्यात मी अशी विसरली स्वःताला मीच मला सापडेल तुझ्या जवळ, हे कारण मला देशील का ?

वेडेपणा....

हरवून जाते मन हे आज धुंद होऊन गात राहते कसला हा वेडेपणा माझा मी अचंबित होऊन जाते हळूच सरकते पाऊल हे वाट तुझी अचूक पकडते तू न नजरेस पडला तर उदास होऊन रडत राहते बघत बसते चोर नजरेने तुला भान माझे मलाच सुटून जाते रमते तुझ्या गोड आठवणीत असाह्य होऊन अश्रू हि निघते

स्वप्न...

निव्वळ बडबड करणारी ती आज शांततेच्या प्रेमात पडली...... कधी स्वप्न न बघणारी ती सतत त्याची स्वप्न बघू लागली..... प्रेमाच्या गप्पा ना कंटाळून जी निघून जायची हल्ली त्याच्याशी प्रेमाची भाषा ती बोलू लागली..... कधी-काळी आपले मन मोकळे व्हावं याचा विचार करणारी ती आज स्वतःच्या मनाशी वाद घालवू लागली......

बेधुंद त्या पावसात.......

""बेधुंद त्या पावसात भिजायचं होते मला फक्त  भिजायचं नाही तर चिंब होऊन नाचायचे होते एक एक थेंबाना हातावर गोंजारायचे होते  नि गार गार टपोरी थेंबांशी  खेळायचे होते  त्या सुसाटाच्या वाऱ्या मध्ये उडायचे होते  नि अंगावर येणारे शहारे अनुभवायचे होते  तो  क्षण मला तुझ्या समेत घालवायचा होता तो क्षण मला आयुष्य भर जपून ठेवायचा होता हळूच होणारा तुझा तो स्पर्श नकळत मनात  उदभवणारे त्या भावनांशी एकरूप व्हायचे होते  विजा कडाडल्या वर तुझे ते मिठीत घेणे आणि  प्रेमाने केसांवरून हात फिरवणे  हे अनुभवायचे होते  ""

माझी शाळा....

काल माझ्या स्वप्नात माझी शाळा आली विसरलीस ना मला म्हणून तक्रार करू लागली परत एकदा तिने तिची स्वतःची ओळख करून दयायला सुरुवात केली   ........ आठवते ना तुज म्हणुन केलेली मस्ती नी खोडकरपणाची चित्रे डोळ्यासमोर उभी केली माझ्याच अंगा-खांद्यावर लहानाचे मोठे होऊन आज इथवर पोहचली  ........ पावसाळ्यात  दांडी तुम्ही मारायचे  पण वाईट मात्र मला वाटायचे भर उन्हात शिक्षा तुम्हाला व्हायची पण त्या उन्हाचे चटके मला लागायचे  ...... कधी हळुहळु तुम्ही मुले मुली मोठे होत गेलात नि मी म्हातारी याचे भान मला ही नाही राहले आज माझ्या भिंती , माझ्या डोक्यावरचे छप्पर माझ्याबरोबर आहेत , मात्र तुमची कमी जाणवू लागले ....... आठवतो का तो गणिताचा तास , घरचा अभ्यास न करता कुठे तरी शाळेच्या कोपऱ्यात लपायचेत आणि मराठीच्या तासाला मोठं मोठ्यांनी पद्याला ताल सुरात गावुन माझे कान फाडायचेत........ विज्ञानाच्या तासाला वाटे जणू आज हि मुले आलेच नाही म्हणुन कुठे तरी मी हिरमुसून जायची आठवतात का रे तुम्हा लोकांनां माझ्या मैदानात खेळुन खेळुं आपले पाय मोडुन घायची ....... आठवते का ...

पहिली भेट....

नियतीने करून दिलेली भेट त्यांची पहिली बाणातून तिर निघावा तशी त्यांची नजरेला नजर भिडली....... मोठया ऐटीत मिरवणारा त्याचा तो रुबाब तिच्या समोर मात्र शून्य झाला ....... तिच्या त्या मधुर स्वरावर नि गोड हास्यावर तो जाम फिदा झाला ....... आता रोज त्याचे चोर नजरेने तिच्याकडे पाहणे सुरु झाले ....... मित्र-मैत्रिणीत रंगणार तो आज तिच्या स्वप्नात रंगून गेला....... तिच्या त्या एक झलक साठी तो वाटेल ते करायला  तयार झाला....... पाहता पाहता त्याने ठरवले करावं का खुलासा आपल्या प्रेमाचा दिवस ठरवला , वेळ ठरवली एवढंच नाहीत तर पद्धत पण ठरवली आज तो दिवस होता ज्याची तो मनापासून वाट बघत होता ....... एकीकडे हृदयाची धकधक तर दुसरीकडे मनाची घालमेल होऊ लागली होती ....... डोक्याने मात्र शांतता पाळली होती....... होकार देईल कि नकार हे दोन विचार नदीचे दोन किनारे जसे जुळवू शकत नाही तसे या मध्ये पण काही जुळवा - जुळवी नव्हती....... डोकं सांगतंय नको मन बोलतो अरे बोलून टाक  शब्द नाहीसे झाले, काय बोलू तिच्याशी  हा मात्र नाही त्या गोंधळात पडला ....... अखेर तो तिच्या समोर येऊन थबकला .....

जुने फोल्डर......

लॅपटॉप मधले जुने फोल्डर चुकून झाले ओपन खूप सोनेरी क्षण ठेवलेले होते त्यात साठवून एका पाठोपाठ एक आठवणी जमा होत गेली आणि जुन्या मात्र कुठे तरी विरळ होत चालली त्यावर आज काल चुकून का होई ना लक्ष काही जात नव्हते असेच धूर खात त्याचे अस्तित्व नाहीसे झाले होते असे ढीगभर फोल्डर वर फोल्डर तयार होत गेली आणि लॅपटॉप ची स्टोरेज डिस्क फुल होऊ लागली Delete करावे म्हटले तर काय काय delete करू मनात साठलेले ती लोक कसे त्यांना format करू हे दुःख पण एका virus सारखा पसरत जातंय हाच एक विचार येतो कि Antivirus टाकायचे तर कुठल्या आनंदाचा ब्रँड याला द्यायचं 

समुद्र किनारा.....

निवांत बसावंसं वाटतं त्या किनारी जिथे फक्त तु नि मी असावे हवाय तुझा हात माझ्या हातात नि मधेमधे सागरी लाटेचे संगीत ऐकावे हळुच सुर्याची किरणे लाटेत  डोकाऊन त्यात माझे प्रतिबिंब तुझ्या डोळ्यात मला दिसावे गारवारा नकळत स्पर्श करुनि ते रोमांचिक शहारे अंगावर देऊन जावे लिहिलेले  नाव तुझे वाळुवर मी त्या सांज वेळी चंद्रामुळे चमकावे दरवळु लागला सर्वत्र प्रेमाचा सुगंध तुझी साथ अखेर राहावी हेच  ऐश्वर्य मागावे  अथांग भरलेल्या त्या अर्णवा (समुद्र) प्रमाणे  आयुष्य   आपले   आनंदाने  तुडुंब भरून जावे ...... 

भातुकलीचा खेळ .....

ह्या अबोल्यामध्ये एक वेगळेच प्रेम दडले नाव तुझे आयुष्यभर माझ्या हृदयात कोरले तू बोल अथवा नको बोलूस तुझे डोळे नि श्वास सगळे काही सांगून जात आहे रागात पण खुप गोड दिसणारा तु तुझ्या स्मित हास्याची थोडी कमी आहे जेवढा लांब जाण्याचा तुझा प्रयन्त असेल तेवढा तुझा पाठलाग मी करत राहील जेवढी फिरवशील पाठ तू तेवढे तुझ्या समोर येऊन उभी राहील प्रेम केले आहे मी तुझ्यावर असे कसे बरे कमी होईल लाख प्रयन्त कर मला विसरण्याचा मी बरे विसरू देईल नको ती सोडून जाण्याची भाषा आपल्यात हवे तर भांड किंवा रागाव रे तू माझ्या वर  कळतंय मला व्यथा तुझ्या मनाची प्रेम तुझे खुप आहे माझ्यावर नको मला तो आठवणीतला पाऊस नि ऊन सावलीचा खेळ आता खरी वेळ आलीये खेळायचा तो भातुकलीचा खेळ 

अव्यक्त प्रेम....

स्वप्नात जरी तू असलास तरी  स्वप्न ते फक्त माझे आहे जरी मनात  नाही मी  तुझ्या मात्र माझ्या या हृदयात तुझंच राज्य आहे ओठांवर नसेल शब्द प्रेम व्यक्त करण्यासाठी पण मनात तुझ्याच नावाची कविता चालू आहे जागत राहते हल्ली तुझ्या आठवणीत आणि रमत असते त्या तारेच्या विश्वात कारण आठवते मज , कधी काळी मोजली होती मी त्यांना तुझ्या सहवासात हरवून बसते कधी कधी त्या समुद्रा काठी का तर माझ्या प्रेमाची शब्द उमटली होती त्या चिंब वाळूवरती स्वतःच स्वतःला देत दिलासा रेखाटू लागली सप्तर्षी रंगाचा सूर तो त्या बेधुंद इंद्रधनुष्यावरती उजळलेल्या त्या अनंत निशब्दांचा थवा आणि साथ लाभली ती दरवळणाऱ्या प्रेमाच्या सुगंधाची खरच किती हा गोड लपाछपीचा अनुभव , नि आनंद वाटतो तो अव्यक्त झालेल्या प्रेमाची 

कॉलेज ची डायरी

आता मात्र कॉलेजच्या डायरी मध्ये रोजचे किस्से लिहिणे कमी होणार रोजचा आमचा कँटिंग चा टेबल आता रिकामा दिसत जाणार तू असे केले होते , तू तसे केले होते हा गोड वादविवाद आता नाहीसा होणार शेवटच्या घटकेला असाइनमेंटची देवाण घेवाण करणे आता थांबवल्या जाणार लायब्ररीत रात्रं दिवस घालवून अभ्यास कमी नि झोप जास्त हे कुठे तरी हरवल्यागत होणार पेपर संपल्या नंतर होणारा आनंद नि एकदुसऱ्यां मध्ये होणारे अंतर हे चित्र दिसणे बंद होणार एकाच डब्यात जेवण करताना शेवटचा घास कोणाला मिळणार याचे तर्क वितर्क थांबणार भर पावसात एकाच छत्रीत सगळे येऊन अर्धवट भिजणे हे आता इतिहासात जमा होणार  

एकतर्फी प्रेम....

तुझी सवय होऊ नये म्हणून सतत तुला टाळत असते .... कारण प्रेम  माझे एकतर्फी म्हणून तुझ्याकडे ओढल्या जाते ..... तुला चोर नजरेने बघून तुझाच चेहरा वाचण्याचा माझा प्रयत्न चालू असते...... ओठांवर हसू तुझ्या आणि मी मात्र गालातल्या गालात लाजून जाते ....... तुझं पण मन माझ्यासाठी झुरत का ? हा एकच प्रश्न सतावत राहतो ...... नि डोळ्यांचा परदा अलगद उघडून "वेडे एकतर्फी प्रेम ना तुझे "हे सांगून जातो ...... दिसताच तू अबोल झाल्यासारखे वाटते  .... जाताच तू काही हरवले असे जाणून येते .... रोज तुझ्या वळणावर डोळे टिपून बसले असते.... आज तुला उमजणार माझे प्रेम हि आशा उराशी जपत असते .....

नेमकं प्रेम कि मैत्री ...

नेमकं प्रेम कि मैत्री या प्रश्नावर येऊन थांबते गुंतलेले  हे मन काही केल्या माघार घेत नव्हते दचकून पाय अडखळावे  तसे माझ्या या विचाराचे व्हायचे चौफेर पसरलेल्या त्या तिमारामधून अलगद आशेची छवी दिसल्यागत व्हायचे आज ओंजळीमधील फुले रोजच्या पेक्षा जास्त सुगंध पसरवू लागली नाही म्हणता म्हणता मी तुझ्यात हळुवार पणे गुंतत चालली  शोधू लागली नवी नवी कारणे रोज तुझ्याशी बोलण्यासाठी रमून जाते तासंतास आजकाल तू न केलेल्या गप्पांमधी न चुकता ,न विसरता, हल्ली मी तुझ्याच बद्दल बडबडत राहते प्रत्येक्षात काय तर स्वप्नात सुद्धा तुझ्याच प्रेमाचे गुणगान गात राहते

हुंदके...

हल्ली काही लिहावसे वाटत नाहि रे कारण तुझ्या त्या आठवणी हुंदके देत बाहेर पडतात अश्रु ही कोरडे पडून फ़क़त त्यांची निशानी ठेऊन जातात तू येशील  माझे अश्रु अलगद पूसशील या आशेने पापण्या बंद होतात हसुन जी खळी गालावर यायची आज ती तू नसण्याने नाहीशी होत जातात खरच हल्ली काही लिहावसे वाटत नाहि रे......... .