Posts

Showing posts from 2016

मुसळधार ...

मुसळधार पावसामुळे चांदण्या हळूच ढगांआड़ गेल्यात क्षणिक वाटू लागले की या काळोख्यात त्या पावसाच्या थेंबांच्या रुपात जमिनीवर पडू लागले विजेच्या लख्ख असा प्रकाश जणू त्या थेंबांची शोभा वाढवू लागली नि ढग आपला  गदगडाट आवाज करून जणू वाटे आपल्या हातांनी  टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करू पाहतेय सोबतच माती स्वःताचा सुगंध अख्ख्या  निसर्गाचा कायापलट करते

माझ पहिले वहिले प्रेम .....

पाहिले जेव्हा तिला  क्षणिक प्रेमात पडावेसे वाटले  नियतीच्या खेळाला हरवून पाहावेसे वाटले  रोज तिची वाट मनाला भिडून जाऊ लागली  गोड तिचे हसु जणु  उमलत्या गुलाबाच्या कळ्या  काहीच काळात नशिबाने थट्टा केली  आयुष्यात काही सगळेच मिळत नाही  ती कशी मिळेल  माझ पहिले वहिले प्रेम  क्षणात दुसर्यांचे जाहले  माझी ओंजळ मी तिच्या साठी उघडली  पण खरच  जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते

सुख ...

सुख म्हणजे काय असते  हळूच बाबांच्या मिठीत जाऊन दिलेला तो गोड पापा असतो ॥   सुख म्हणजे काय असते डोक्यावरून आईने मायेनी फिरवलेल्या हाताची ऊब असते ॥ सुख म्हणजे काय असते एकाच वस्तुसाठी ताईशी झालेले भांडण असत ॥ सुख म्हणजे काय असते दादु जवळ एखाद्या वस्तुसाठी केलेला हट्ट असतो ॥ सुख म्हणजे काय असते रुसलेल्या मित्र-मैत्रिणी समोर उठक बैठक करुन त्यांच्या चेहर्यावरील हसु असत ॥

सरी...

" पावसाच्या सरी पडून गेल्या मातीला असा गोड़ सुगंध सुटला एक एक थेंब मनाला भिडू लागला डोळ्यांना गारवा स्पर्श करुन  गेला हळूच गालांवर केसांचा लपंडाव सुरु झाला नकळत मनातून शब्द फुटले तीच शब्द लिहावेसे वाटले  "

कोणीतरी...

कोणीतरी जीवनात असा भेटून जातो आपल्या चेहर्यावर चमक देऊन जातो ओठांवर हसु तर गालांवर लाली देऊन जातो डोळ्यात एक स्वप्न तर जगण्याला नविन मार्ग शोधून देतो भविष्याच्या रेषा उमटून भुतकाळ विसरून वर्तमान जगायला शिकवतो आनंदाचा पाऊस नि प्रेमाची सावली देऊन जातो हळूच अबोल हे मन पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे खदखदु लागत।

मैत्री.....

सहवासातून होते ती मैत्री अनुभवाने घट्ट होते ती मैत्री वाद विवादाने प्रेमळ होते ती मैत्री नको असलेल्या जोक्स वर हसते ती  मैत्री रक्तापलीकडले नाते म्हणजे मैत्री समजायला कठिन पण उमजायला सोपे ती मैत्री दुःखात खरी ठरते  ती मैत्री सुखात आपुलकी दाखवते  ती  मैत्री !

तो...

सतत माझ्या बोलण्यावर तो फ़क्त हसायचा काही बोल म्हटले तर  एक स्मित हास्य देऊन बघत रहायचा  कधी चुप झाली तर तो अस्वस्त व्हायचा  डोळ्यांआड़ गेली तर शोधत राहायचा  भेटण्याआधी झालेली  त्याची धुसमुस कळायची मला  बघता क्षणी आलेला  त्याच्या चेहऱ्यावर तेज  बघून मनात चालले विचार लगेच  आपली वाट परतून  जायची 

नजरेस पडला..

ती हळूच सगळ्यां समोर येऊन बसली नि तिचा लाल झालेला चेहरा त्याच्या नजरेस पडला प्रथम झालेली भेट बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला थेट  शब्दाने नाही तर नजरेने बोलणे सुरु झाले  बोलणार कसे ना सगळ्यांचे डोळे त्यांच्यावर टिपलेले सभोवताल एक वेगळीच शांतता पसरली हळुवार डोळ्यांना डोळे भिडले तिने लाजुन वरती पाहिले तो फ़क्त तिलाच बघत होता व्याकुळ  झालेले ते मन नाही राहिले कश्याचेच  भान   

उजाड़ा...

आज बऱ्याच दिवसांनी मैत्रीला उजाड़ा मिळाला नकळत जुन्या गोष्टी नविन स्वरुपात निघाल्या जीवाभावाची नाती अजुनच घट्ट होताना दिसल्या शब्द तसे अर्थ निघाले भावना तसे मन जुळले विचाराला नविन दिशा मिळाली बघता बघता हवेत टाळ्यांचा सुर गवसला 

स्वप्न....

हळूच पापणीवरची स्वप्ने साक्षात होताना दिसले नाही म्हटले हे वेडे मन तरी प्रेमात पडावेसे वाटले नकळत गालांवर गोड लाली येऊन डोळ्यांमधे नविन स्वप्नांचा जन्म झाला आरश्यामधे पाहून माझाच मला प्रश्न पडला आज माझ्याच स्मित हास्यामधे वेगळेपण दिसून  आले नि हृदयाची स्पंदने तर  कधीच परकी झाले 

जीवनाचे रंग.......................

जीवनाचे रंग वेगळे नानापरिने अनुभवले कधी मैत्री तर कधी प्रेम कधी हसु तर कधी अश्रु कधी सावली तर कधी उन्ह मनाच्या या आंतरगाभाऱ्यामधले कोणाला कधी दीसलेच नाही चेहऱ्यावर होते हसु मात्र डोळ्यात त्या भावनेचे होते आसु मन पण काय असते नाहीं माहिती असते ते आपले नाही तरी भेटण्याची हाव बागळताहेत स्वप्नातील परी नि राज्याची कहानी आज खोटी वाटायला लागली मुर्ख होते ते मन वेडे होते ते मन नाही त्या जगात आपली जागा करू पाहतो आहे नि मी मात्र स्तब्धतेने पाहते आहे