Posts

Showing posts from 2019

वेडेपणा....

हरवून जाते मन हे आज धुंद होऊन गात राहते कसला हा वेडेपणा माझा मी अचंबित होऊन जाते हळूच सरकते पाऊल हे वाट तुझी अचूक पकडते तू न नजरेस पडला तर उदास होऊन रडत राहते बघत बसते चोर नजरेने तुला भान माझे मलाच सुटून जाते रमते तुझ्या गोड आठवणीत असाह्य होऊन अश्रू हि निघते

स्वप्न...

निव्वळ बडबड करणारी ती आज शांततेच्या प्रेमात पडली...... कधी स्वप्न न बघणारी ती सतत त्याची स्वप्न बघू लागली..... प्रेमाच्या गप्पा ना कंटाळून जी निघून जायची हल्ली त्याच्याशी प्रेमाची भाषा ती बोलू लागली..... कधी-काळी आपले मन मोकळे व्हावं याचा विचार करणारी ती आज स्वतःच्या मनाशी वाद घालवू लागली......

बेधुंद त्या पावसात.......

""बेधुंद त्या पावसात भिजायचं होते मला फक्त  भिजायचं नाही तर चिंब होऊन नाचायचे होते एक एक थेंबाना हातावर गोंजारायचे होते  नि गार गार टपोरी थेंबांशी  खेळायचे होते  त्या सुसाटाच्या वाऱ्या मध्ये उडायचे होते  नि अंगावर येणारे शहारे अनुभवायचे होते  तो  क्षण मला तुझ्या समेत घालवायचा होता तो क्षण मला आयुष्य भर जपून ठेवायचा होता हळूच होणारा तुझा तो स्पर्श नकळत मनात  उदभवणारे त्या भावनांशी एकरूप व्हायचे होते  विजा कडाडल्या वर तुझे ते मिठीत घेणे आणि  प्रेमाने केसांवरून हात फिरवणे  हे अनुभवायचे होते  ""

माझी शाळा....

काल माझ्या स्वप्नात माझी शाळा आली विसरलीस ना मला म्हणून तक्रार करू लागली परत एकदा तिने तिची स्वतःची ओळख करून दयायला सुरुवात केली   ........ आठवते ना तुज म्हणुन केलेली मस्ती नी खोडकरपणाची चित्रे डोळ्यासमोर उभी केली माझ्याच अंगा-खांद्यावर लहानाचे मोठे होऊन आज इथवर पोहचली  ........ पावसाळ्यात  दांडी तुम्ही मारायचे  पण वाईट मात्र मला वाटायचे भर उन्हात शिक्षा तुम्हाला व्हायची पण त्या उन्हाचे चटके मला लागायचे  ...... कधी हळुहळु तुम्ही मुले मुली मोठे होत गेलात नि मी म्हातारी याचे भान मला ही नाही राहले आज माझ्या भिंती , माझ्या डोक्यावरचे छप्पर माझ्याबरोबर आहेत , मात्र तुमची कमी जाणवू लागले ....... आठवतो का तो गणिताचा तास , घरचा अभ्यास न करता कुठे तरी शाळेच्या कोपऱ्यात लपायचेत आणि मराठीच्या तासाला मोठं मोठ्यांनी पद्याला ताल सुरात गावुन माझे कान फाडायचेत........ विज्ञानाच्या तासाला वाटे जणू आज हि मुले आलेच नाही म्हणुन कुठे तरी मी हिरमुसून जायची आठवतात का रे तुम्हा लोकांनां माझ्या मैदानात खेळुन खेळुं आपले पाय मोडुन घायची ....... आठवते का रे  "माझी शाळा , माझी शाळा &q

पहिली भेट....

नियतीने करून दिलेली भेट त्यांची पहिली बाणातून तिर निघावा तशी त्यांची नजरेला नजर भिडली....... मोठया ऐटीत मिरवणारा त्याचा तो रुबाब तिच्या समोर मात्र शून्य झाला ....... तिच्या त्या मधुर स्वरावर नि गोड हास्यावर तो जाम फिदा झाला ....... आता रोज त्याचे चोर नजरेने तिच्याकडे पाहणे सुरु झाले ....... मित्र-मैत्रिणीत रंगणार तो आज तिच्या स्वप्नात रंगून गेला....... तिच्या त्या एक झलक साठी तो वाटेल ते करायला  तयार झाला....... पाहता पाहता त्याने ठरवले करावं का खुलासा आपल्या प्रेमाचा दिवस ठरवला , वेळ ठरवली एवढंच नाहीत तर पद्धत पण ठरवली आज तो दिवस होता ज्याची तो मनापासून वाट बघत होता ....... एकीकडे हृदयाची धकधक तर दुसरीकडे मनाची घालमेल होऊ लागली होती ....... डोक्याने मात्र शांतता पाळली होती....... होकार देईल कि नकार हे दोन विचार नदीचे दोन किनारे जसे जुळवू शकत नाही तसे या मध्ये पण काही जुळवा - जुळवी नव्हती....... डोकं सांगतंय नको मन बोलतो अरे बोलून टाक  शब्द नाहीसे झाले, काय बोलू तिच्याशी  हा मात्र नाही त्या गोंधळात पडला ....... अखेर तो तिच्या समोर येऊन थबकला ....... हातात ग

जुने फोल्डर......

लॅपटॉप मधले जुने फोल्डर चुकून झाले ओपन खूप सोनेरी क्षण ठेवलेले होते त्यात साठवून एका पाठोपाठ एक आठवणी जमा होत गेली आणि जुन्या मात्र कुठे तरी विरळ होत चालली त्यावर आज काल चुकून का होई ना लक्ष काही जात नव्हते असेच धूर खात त्याचे अस्तित्व नाहीसे झाले होते असे ढीगभर फोल्डर वर फोल्डर तयार होत गेली आणि लॅपटॉप ची स्टोरेज डिस्क फुल होऊ लागली Delete करावे म्हटले तर काय काय delete करू मनात साठलेले ती लोक कसे त्यांना format करू हे दुःख पण एका virus सारखा पसरत जातंय हाच एक विचार येतो कि Antivirus टाकायचे तर कुठल्या आनंदाचा ब्रँड याला द्यायचं 

समुद्र किनारा.....

निवांत बसावंसं वाटतं त्या किनारी जिथे फक्त तु नि मी असावे हवाय तुझा हात माझ्या हातात नि मधेमधे सागरी लाटेचे संगीत ऐकावे हळुच सुर्याची किरणे लाटेत  डोकाऊन त्यात माझे प्रतिबिंब तुझ्या डोळ्यात मला दिसावे गारवारा नकळत स्पर्श करुनि ते रोमांचिक शहारे अंगावर देऊन जावे लिहिलेले  नाव तुझे वाळुवर मी त्या सांज वेळी चंद्रामुळे चमकावे दरवळु लागला सर्वत्र प्रेमाचा सुगंध तुझी साथ अखेर राहावी हेच  ऐश्वर्य मागावे  अथांग भरलेल्या त्या अर्णवा (समुद्र) प्रमाणे  आयुष्य   आपले   आनंदाने  तुडुंब भरून जावे ...... 

भातुकलीचा खेळ .....

ह्या अबोल्यामध्ये एक वेगळेच प्रेम दडले नाव तुझे आयुष्यभर माझ्या हृदयात कोरले तू बोल अथवा नको बोलूस तुझे डोळे नि श्वास सगळे काही सांगून जात आहे रागात पण खुप गोड दिसणारा तु तुझ्या स्मित हास्याची थोडी कमी आहे जेवढा लांब जाण्याचा तुझा प्रयन्त असेल तेवढा तुझा पाठलाग मी करत राहील जेवढी फिरवशील पाठ तू तेवढे तुझ्या समोर येऊन उभी राहील प्रेम केले आहे मी तुझ्यावर असे कसे बरे कमी होईल लाख प्रयन्त कर मला विसरण्याचा मी बरे विसरू देईल नको ती सोडून जाण्याची भाषा आपल्यात हवे तर भांड किंवा रागाव रे तू माझ्या वर  कळतंय मला व्यथा तुझ्या मनाची प्रेम तुझे खुप आहे माझ्यावर नको मला तो आठवणीतला पाऊस नि ऊन सावलीचा खेळ आता खरी वेळ आलीये खेळायचा तो भातुकलीचा खेळ 

अव्यक्त प्रेम....

स्वप्नात जरी तू असलास तरी  स्वप्न ते फक्त माझे आहे जरी मनात  नाही मी  तुझ्या मात्र माझ्या या हृदयात तुझंच राज्य आहे ओठांवर नसेल शब्द प्रेम व्यक्त करण्यासाठी पण मनात तुझ्याच नावाची कविता चालू आहे जागत राहते हल्ली तुझ्या आठवणीत आणि रमत असते त्या तारेच्या विश्वात कारण आठवते मज , कधी काळी मोजली होती मी त्यांना तुझ्या सहवासात हरवून बसते कधी कधी त्या समुद्रा काठी का तर माझ्या प्रेमाची शब्द उमटली होती त्या चिंब वाळूवरती स्वतःच स्वतःला देत दिलासा रेखाटू लागली सप्तर्षी रंगाचा सूर तो त्या बेधुंद इंद्रधनुष्यावरती उजळलेल्या त्या अनंत निशब्दांचा थवा आणि साथ लाभली ती दरवळणाऱ्या प्रेमाच्या सुगंधाची खरच किती हा गोड लपाछपीचा अनुभव , नि आनंद वाटतो तो अव्यक्त झालेल्या प्रेमाची