मी , तो आणि समुद्र ..... 3
निल त्याच्या घरी पोहचतो.तिच्याच विचारात तो मग्न झालेला असतो तेच क्षणर्थात त्याला चक्कर येऊन तो खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो . निलच्या घरचे गोंधळलेल्या अवस्थेत डॉक्टरला बोलावून त्याची तपासणी करतात , आणि घरच्यांसमोर गंभीर असे सत्य बाहेर येते . हल्ली रोज निल स्वतः या दुःखांमध्ये सतत अस्वस्थ असायचा , कारण घरच्या लोकांकडे त्याला द्यायला असा वेळच नसायचा .म्हणून कोणालाही न सांगता तो हे दुःख सहन करत होता , हे घरच्यांना कळताच सगळे घर हादरून जात . पण निल खंबीर होऊन सगळ्यांना सांभाळतो . तेवढ्यात डॉक्टर बोलतात निलकडे खुप कमी वेळ आहे साधारणतः १ ते २ महिने . तेवढ्यात निल खचून जातो , त्याच्या डोळ्यांसमोर लगेच सई चा चेहरा येतो . त्याचे वचने , त्याचे प्रेम , घालवलेले ते क्षण त्याच्या पुढे येऊन पावसाच्या सरी सारखे बरसु लागतात .
दुसरीकडे सईला मात्र याची काहीच कल्पना नसते. ती आपली स्वप्न सजवण्यात एवढी मग्न होते की आपले घर कसे असणार , आपण कुठे राहणार हे सुद्धा तिने ठरवून घेतले होते . शिवाय तिच्या नि निलबद्दलच्या नात्याचा खुलासा तिने घरच्यां समोर सुद्धा केला होता , घरचे हि सईच्या आनंदा खातीर तयार झाले होते , त्यामूळे सईचा आनंद गगनात मावेनासा झाला . हिच गुड न्यूज द्यायला सई निलला कॉल करते मात्र फोन लागत नाही , ती परत परत प्रयत्न करत राहते . इकडे मात्र निलला काय करावं काही सुचेना झाले , एकीकडे निल चे कुटुंब आणि दुसरीकडे सई तो पूर्णतः गोंधळून गेला होता . नि महत्वाचे म्हणजे त्याच्या कडे उरलेला थोडाच वेळ , ह्यात तो सई ला हवे ते देऊ हि शकत नव्हता, लग्न तर दूरच राहिले , तो साधा वेळ हि तिला देऊ शकत नव्हता . त्याची शारीरिक परिस्थिती हि हालाकाची झाली होती . विचारत करता करता निलने काय तो निर्णय घायचा ते ठरवून घेतले . सई परत त्याला दुसऱ्या दिवशी फोन करते पण पलीकडली बाई तेच बोलू लागते (आपण डायल केलेला नंबर बंद आहे तरी थोड्या वेळाने प्रयत्न करा ). सईला आश्चर्य वाटले की, हा असा कधी करत नाही मग आज काय झाले ? कामात असेल कदाचित ,पण किमान एक msg करून मला सांगु तर शकतो ना . असो समुद्रकिनारी भेटल्यावर विचारते त्याला काय ते . तशी ती समुद्राच्या दिशेने निघते आणि थोड्याच वेळात येऊन पोहचते मात्र आज निल आला नव्हता . ती उदास झाली , परत परत त्याचा नंबर डायल करू लागली , आता ती बेचैन झाली , तिला त्याचे घर हि नव्हते माहिती , कुठे शोधू मी याला (मनात : एक मिनिटं सई , वेडी काही तरी कामात अडकला असेल तो , किती विचार करणार त्याच्याबद्दल ) आणि ती घरी निघून येते . हे आता रोजचे झाले होते . ती नेहमीप्रमाणे यायची आणि उदास होऊन घरी परतू जायची . १५ दिवस उलटून गेले , आज परत ती समुद्रकिनारी गेली कदाचित आज तरी माझी भेट होईल निलशी या आशेने तिने स्वतःचे डोळे कोरडे केले व नेहमीच्या जागी येऊन बसली . पण हे सगळे व्यर्थ ठरले . बघता बघता दीड महिना उलटून गेला पण निलचा काहीच पता नव्हता . ती आतून तुटून गेली होती , माझंच काही तरी चुकले असावे म्हणून हा मला सोडून गेला असे तिला वाटायला लागले . रोज त्याच ठिकाणी जाऊन त्याची वाट बघणे आणि परत उदास होऊन घरी येणे , आता तिला याची सवय झाली . सईला असे बघून मात्र अंतराला तिची काळजी वाटू लागली .
साधारणतः २ महिन्या नंतर अंतरा सईला म्हणते ,चल आज समुद्रसपाटीला जाऊया . सईची इच्छा नसताना हि सई अंतराला लगेच होकार देते , आणि त्यादोघी नेहमीच्या जागी येऊन बसतात .तिथे पोहचल्यानंतर हळूहळू सईला निल सोबत घालवलेल ते क्षण आठवतात . त्यांची पहिली भेट , पहिला सवांद असे बऱ्याच गोष्टी तिच्या डोळ्यांपुढे येऊन रांगत राहतात . तेवढयात मागून सईच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो , तेच सई मोठ्याने ओरडून निलSSSSS, पण समोरच्या व्यक्तीला बघून सई परत निराश होते .
सई- कोण तू ? (जरा शंकेच्या नजरेने)
वरुण- मी वरुण , तू सई ना ?
सई - हो !पण तू मला कसा ओळ्खतोस.
वरुण - निल सांगायचा तुझ्या बद्दल. किंबहुना मी तुला ह्या ठिकाणी नेहमीच बघायचो .
सई - निल? कुठेय तो? , आणि येवढ्या दिवसांपासून काय करतोय तो , कसा आहे तो , बराय ना , आणि हो तो विसरला नाही ना मला ?
वरुण- तो तुला विसरला की नाही , तो कसा आहे वैगेरे तुला या पत्रा मधून कळेल . त्याने हे पत्र तुझ्यासाठी लिहिलंय , यात काय आहे हे मला मुळीच ठाऊक नाही , त्याचा निरोप होता की हे पत्र तुझ्या हातात सुखरूप रित्या पोहचावे ,म्हणून त्याने मला सांगितले .हे घे , नि वाच तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर यामधून मिळेल असे निल मला म्हणाला होता . आणि हो काळजी घे मी निघतो .... वरूण थोडा दुःखी नि चिंतेत दिसत होता , तो अजून थोडा वेळ जरी तिच्यासमोर थांबला असता तर त्याला रडू फुटले असते हे निश्चित होते .तेवढ्यात सई पुढे बोलू लागते
सई- पण तो का नाही आला (स्वतःला सावरत) आणि गेल्या दीड माहिन्यांपासून तो माझा कॉल पण उचलत नाहीये ,का असे ? . तुला माहिती असेलच ना , तुझी भेट झालिये ना , मग सांग ना मला .(सई विनवणी करू लागली)
वरुण- अग हो मला सगळे कळतय , पण मी तुला काहीच सांगू शकत नाही. हे पत्र तू वाच तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ह्यात आहे नि ते समजेल तुला . संकोच होऊन वरुण तिथून निघून जातो आणि बघता बघता तो डोळ्यांच्या आड होतो .सईच्या हातात असलेलं पत्र सई भीतभीत उघते आणि वाचायला सुरुवात करते.
प्रिय सई
कशी आहेस ? वरून पत्र द्यायला आल्यावर तुझा पहिला प्रश्न कुठला असेल माहिती आहे मला ,निल कुठेय ? हो ना . खुप प्रश्न पडली असतील ना , मला ही पडली जेव्हा मला माहिती झाले की माझं हे सुंदर आयुष्य जास्त दिवस माझ्या सोबत नाही , कदाचित तुला हे पत्र मिळाल्यावर खुप उशीर झालेला असेल .तुला भेटण्याआधीच मला समजले होते की माझं हे आयुष्य खुप कमी दिवसाचे आहे . म्हणून स्वतःला आधार देण्यासाठी मी समुद्रकिनारी यायचो , तुला पहिल्याच दिवशी बघून तुझ्या प्रेमात पडलो , तुला नाकारण्यासाठी तुझ्यात कमी काहीच नव्हती मात्र माझी झुंज हि आयुष्याबरोबर चालू होती . आपली भेट होत नव्हती , तेव्हा तुला जेवढे दुःख झाले होते त्यापेक्षा तुला न बघणं मला प्रत्येक क्षणी मरण्यासारखं होत . तुला सगळे सांगावे म्हणून दरवेळेस प्रयत्न करायचो मात्र भावुक होऊन आणि तुझ्या हास्याकडे बघून माझी हिम्मत होत नव्हती . माझे आयुष्य मला तुझ्या सोबत घालवायचे होते पण " साला ये लाईफ " साथ देत नाहीये . मला माहिती आहे एवढ्या दिवसापासून मी तुला साधा कॉल पण नाही केला कारण मला तुला दुखवायचे नव्हते (दुखावले तर आहेच मी ) मात्र तुझ्यासमोर क्षणोक्षणी माझा अंत बघताना , मला जास्त त्रास झाला असता म्हणून तुला माझ्यापासून दूर करणे हाच एक उपाय माझ्यासमोर होता . आता तुला प्रश्न असेल मी काय बडबडतोय . होय ना ?
पत्र वाचताना सई हुंदके देत स्वतःला सावरून पुढे वाचायला सुरुवात करते ........
माझ्यात मुळीच हिम्मत नव्हती तुला हे सगळं समोरासमोर सांगणे , म्हणून हे पत्रामार्फत तुला सांगत आहे , तुला राग येईल, संताप होईल पण तूच विचार कर मी काय करायला हवं होत . सई ! मी तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण जपुन माझे उरलेले दिवस घालवायचे ठरवले . एक इच्छा म्हण किंवा शेवटची इच्छा तु तुझे आयुष्य पुर्णपणे जगुन घे .... आपण पाहिलेले ते स्वप्न तु नवीन रित्या जग . एवढं करशील ना ? मला माहिती आहे माझा शब्द तु मोडणार नाहीस हो ना . कारण माझ्या सईला काहीच अशक्य नाही . अजून एक विनंती तुला, माझ्या जाण्याचे दुःख न बागळता आयुष्यात पुढे जा . स्वतःच आयुष्य सुखाने घालावं . ............
तुझाच निल
I love u
हे सगळे वाचताना सई ते अश्रू काही केल्या थांबत नव्हते . दोन्ही हाताने पत्र पकडत ती खाली बसली आणि हुंदके देत रडू लागली . का माझ्या सोबत असे झाले म्हणुन देवा कडे तक्रार करू लागली . निल बरोबर घालवलेले ते क्षण तिला आठवू लागली ,त्याचा चेहरा तिच्या नजरे समोरून जात नव्हता . अंतरा तिला धीर देत तिला समजावून सांगू लागली . थोड्यावेळसाठी सईला वाटले मीच जगुन तरी काय करू मात्र निलने पत्रात लिहिलेले त्याच्या शब्दाने तिला अडवले ........
Comments