Posts

Showing posts from 2015

आयुष्याच्या वरणावर........................

आयुष्याच्या वरणावर खुप भेटता  पण आठवणीत मात्र आपलेच राहतात  मैत्री ही करता येत नाही तर  ती एका पाण्यावरच्या  दवबिंदु प्रमाणे हळूच होऊन जाते  मैत्रीची गाणी गाताना हरवुन जातो आपल्याच जगात  मग कोणास ठाऊक का सोडून जातात  तो कॉलेज चा पहिला दिवस नि मिळवलेला तो पहिला हात  का बरे  सुटतात कॉलेज संपल्यावर  " म्हणतात की        मैत्री चंदनाप्रमाणे हवी       नेहमी सुगंध देणारी " का बर तोच सुगंध नकोसा वाटतो  असो पण जीवनात मैत्री नावाचा रस्ता हवाच       

" माझ्या कविता " ....

मनातील शब्द ओठांवर येण्यासाठी झालेली ती धुसमुस  | डोळ्यांतील अश्रु गालांवर येण्यासाठी झालेली ते वाद - विवाद  | झालेल्या  गमंतीवर हसण्यासाठी बसलेली ती मित्र-मैत्रिणीची सभा | एकटे बसल्यावर नकळत लिहित बसते मी  " माझ्या कविता " |

मित्रत्वाची जाणीव ..

तुझ्या चेहऱ्यावर आलेले तेज तुझ्या ओठांवर आलेले हसु  हळूच आम्हा मित्रांचा राग घालवतो  तुझे स्मित हास्य आपल्या मित्रत्वाची  जाणीव करू  बघतो  तुझे साधे राहणे न  चुकता गोड बोलणे  झाली कधी  चूक की प्रेमाने रागावाने  नाही ऐकले तर अबोला होणे  हेच तर तुझ्या माझ्या मैत्रीची  खरी ओळख आहे।  ....  

सण हा आनंदाचा...

घरट्या मधील पाखरे फिरती परतीला  क्षण हा आनंदाचा  येईल आयुष्याला  नाती जमती एकमेकांच्या मनात  सोहळा सुखाचा येती घरात  आंब्याची पाने नी झेंडुची फुले  शोभे तोरण दाराला सण हा आनंदाचा दया एकमेकांना शुभेच्छा करा मन प्रसन्न ............................ 

मैत्री नावाचे चॅप्टर....

जीवनात मैत्री नावाचे चॅप्टर नसते तर आयुष्य किती उदास असते कॅंटीन मधे बसून सुद्धा भरलेली चाय ची कप रिकामी वाटली असती कट्ट्या वर निवांत बसलेलो असले तरी मनात असंख्य प्रश्नाचे उत्तरे वादळी वाऱ्यागत उसळू लागले असती कधी बेंच तर कधी नोटबुक या चे तबला बनवून आयुष्याचे संगीत तयार करणेच विसरले असते क्लास संपल्यावर होणाऱ्या गप्पा सोबतच वादविवाद  नि दुसऱ्यांच्या टिंगल्या उडवणे हे कधी अनुभवल्या गेलेच नसते

होय ते प्रेमच होते....

होय ते प्रेमच होते मैत्रीचे नाव देऊन माझे प्रेम निभवत होते खट्याळ तुझ्या चेहऱ्यांवर हसु फुलवून मी माझ्याच भावनांशी झुंजत होते पाहताच तुला आठवला तो पाऊस आठवल ते ढगाळलेल आकाश वाटायला लागले गर्जेल नव्याने गीत गात एकाच वाटेने लागले चालू सवांद आपल्यात नाही तर आपल्या मनाचा लागलाय होउ कधी डोळे तर कधी मन मात्र ओठांवरून शब्दच नाहीसे झाले पाऊस तर एक निमित्त होते होय ते प्रेमच होते 

नव्याने प्रेमात पडून .....

नव्याने प्रेमात पडून नव्याने जगायला शिकले जुने स्पंदने हृदयाचे हरवून एक नविन स्पंदने निर्माण झाले हे मन कधी आकाशात उडू पाहते तर कधी वाहत्या पाण्यात बुडु पाहते हॄदयाचा नि मनाचा झालाय सवांद सुरु नसलास जेव्हा तू हे डोळे आसुसलेले असतात पाहायला तुला असलास जवळ तू हळूच पाहताक्षणी तुला अलगद पापण्या लाजुन खाली झुकतात हळूच गालांवरचा रंग गुलाबी होतो नि ओठांवर तुझेच नाव येते 

रंग...

इंद्रधनुष्याचे रंग आयुष्याच्या रंगांमधे मिसळू लागले आणि मी  तुझ्यात गुंतू लागली जीवनाचे गीत नव्याने लिहायला घेतली सुरुवात प्रेम या शब्दाने केले कधी स्वप्नात तर कधी बोलण्यात नकळत तुझाच होतोय भास क्षणोक्षणी जागोजागी होउ लागलाय तुझाच आभास हळूच हृदयाचे स्पंदने परकी वाटायला लागली नकळत तुझ्याच स्वप्नात रंगु लागली

गार वारा .......

तो एक गार वारा जो हळूच गालांवर आलेल्या  केसाला स्पर्श करु  जातो तो एक गार वारा  जो तुला बाघता  क्षणी  मनामधे सागरी लाटा  उथळुन जातो  तो एक गार वारा   जो नभला साथ देणारे  पाखरू आपल्या प्रेमाची  कबूली देणुन जातो   तो एक गार वारा भर पावसात नाचून दमलेला मोर आपला आनंद अश्रुद्वारे व्यक्त करुण जातो 

साथ मैत्रीची .........

मैत्री असावी समुद्राप्रमाणे निखळ मायेने भरलेले मैत्री असावी आपल्या डोळांप्रमाणे दुःखात असो वा सुखात अश्रु मात्र अमृतासारखे निघणारे मैत्री असावी नदी प्रमाणे माहिती असते प्रवास करून शेवटी समुद्राला भिडणारी  मैत्री असावी गुलाब -काट्याप्रमाणे गुलाब तोड़ताना काट्याची जाणीव करून देणारी मैत्री हवी झाड्याच्या पालवी प्रमाणे स्वत: झडून दुसऱ्याना ताट मानेने उभी करणारी  

रुसवा तो गोडवा....

सहवास संपतो , दुरावा निर्माण होता मनाच्या गाभार्यामधे आठवणी साठवुन जातात आली कधी आठवण तर मनाची बंद झालेले दरवाजे हळूच उंघते आठवणीचे पुस्तक उघडल्यावर जवळच्या माणसाचे चेहेरे दिसायला लागते अस्पष्ट चेहरे कधी स्पष्ट होते हे क्षणार्थात विसरायला होते नात्यांचा गोडवा नि जवळच्यांचा रुसवा असे दोन भाग दिसून येते गर्दीत उभे राहु सुद्धा एकांत वाटतो। ...................

जाणीव

नाती  टिकवण्याचे कौशल्ये होते  नाती बनवण्याचे गुण होते माझ्या मनाची जाणीव होती त्याला माझ्या ह्रदयाची काळजी होती त्याला मी तुझ्यावर प्रेम करतो असे कधी न म्हणता सतत माझ्या वर प्रेम करत होता माझ्या मनात मी त्याची प्रतिमा केली असे टिकावे तुझे नु माझे नाते असे देवाकडे प्रार्थना केली भीती वाटायला लागली मला वाटते कि हरवून बसेल तुला

निसर्ग....

 निसर्ग पाहता पाहता झाले मी निसर्गाच्या स्वाधिन विसरून घर परिवार रमले मी तुझ्या कुशीत मऊ आणि थंड तुझी कुशी जशी आहे आईची कुशी दूरवर गेले ,नाही भेटले मला कोणी भय नव्हते मला कारण मी तर होते तुझ्या कुशीत असे वाटते राहून जावे तुझ्या समेत दिर्घकाळ ..........

नाती ............

आयुष्यात काही नाती रक्तापलीकडली असतात जीवनाच्या या प्रवासमध्ये अशी नाती क्वचित भेटतात मनाच्या या समुद्रामधे वाळूपेक्षा मोतीच जास्त साठवले जातात अमावसेला नसलेला चंद्र पण गालातल्या गालात हसून मोकळा होतो तशीच ही नाती आपलेसे करून घेतात चंद्राला पण ईर्ष्या होईल अशी चंद्रापेक्षा पांढरे शुभ्र मन असलेली काही नाती जीवनात मिळतात                             

आपुलकी..............

कविता सुचाव्या असे विषयच उरले नाही विषय सुचला तरी शब्द मात्र फुटत नाही             शब्द सुचला तर             अर्थ निघत नाही             नि अर्थ जुळला तर             भावना तश्याच कोरड्या ओलावा मिळतो तो फ़क्त आपुलकीचा मात्र ही आपुलकीच करणारे जीवनात भेटत नाही            भेटले तरी नाही त्या            आठवणी देऊन जातात            नि शेवटी काय            आयुष्यात फ़क्त आठवणीच राहतात

निमित्त ....

हवय निमित्त मला तुझ्याशी भांडायला हवय निमित्त मला तुझे गालगुच्चे ओढायला हवय निमित्त मला तुझ्या डोळ्यात मला शोधायला हवय निमित्त मला नकळत मला बघता क्षणी तुझ्या चेहऱ्या वरील उजळलेले तेज बघायला हवय निमित्त मला तुझ्या हृदयाचे ठोके ऐकायला हवय निमित्त मला तुझ्या आयुष्यात हसू फुलवायला हवय निमित्त मला तुझे आयुष्य सावरायला हवय संधी  मला

ती......

  ती बेधुंद नजरेने बघत होती आणि मी माझ्या नजर चुकवीत होतो जाणीव होती मला आणि समजुन घ्यायचे होते तिला तिची वाट  मला तिच्याकडे ओढू लागली माझ्या मनात तिची जागा वाढू लागली दिशा बदलावी सुर्याची तसा मी माझी दिशा चुकवु लागलो मात्र मनापासुन तिच्या वर प्रेम करू लागलो तिचे ते ओठ जणु मला बोलावताहेत तिचे ते डोळे जणु मला शोधताहेत विचारात पडावे तसा मी तिच्या प्रेमात पडलो गर्दीत ती एकटी वाटत होती आणि मला तिची काळजी वाटत होती गोड तिचे हसु त्यामध्ये मला काही कमी वाटत होती

मैत्री

मैत्री तर हजारो मिळतात मात्र मनात काहीच घर करून जातात फुलाला रंग यावा तसा हा मैत्रीचा रंग खुलतो कळी कधी फुल बनतो नि कधी सुगंध पसरवतो हे कळायला पण  नाही येत तोडायला जावो तर त्याचा मऊ स्पर्श आणि सुगंध आपल्याला मोहात पाडतो नि मनात असलेला कडवटपणा घालवतो

तुझ्या आयुष्यात ...........

हरवुन तुझ्या गोष्टी मध्ये भामबावरून तुझ्या डोळ्यां मध्ये आले ओठी शब्द बघताक्षणी तुला मी झाले निशब्द नको नको म्हटले माझे मन नको नको म्हटले माझे मन .....तुला शेवटी जे काही केले या वेडया मनाने  केला हवी आहे तुझी साथ मला कधी पडताना सावरायला तर कधी नकळत मनामधले जाणुन घ्यायला

भाषा प्रेमाची

प्रेमाला नसते भाषा असते फक्त नि फक्त भावना भावनाला नको असते शब्द ते तर डोळेच सांगुन जातात प्रेमात ओठांची नसते गरज असते फक्त एक  नजर मनातले नुसत शब्द नाही तर तो एक अश्रूचा थेंब सांगुन जातो क्षणार्थात पाखरू होऊन कधी फुलां वर बसतो हे विसरायला पडत नात तिखट गोड बनत