(अर्थ शब्दाचे ,स्वप्न आनंदाचे ,नाती मोलाची , भावना मनाची )
मैत्री
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
मैत्री तर हजारो मिळतात
मात्र मनात काहीच
घर करून जातात
फुलाला रंग यावा तसा
हा मैत्रीचा रंग खुलतो
कळी कधी फुल बनतो
नि कधी सुगंध पसरवतो
हे कळायला पण नाही येत
तोडायला जावो तर
त्याचा मऊ स्पर्श
आणि सुगंध आपल्याला मोहात पाडतो
नि मनात असलेला कडवटपणा घालवतो
रिक्त झालाय मन कि भरून आलाय हे मज काही कळेना माजलाय भावनांचा कल्लोळ हा काही केल्या थांबेना हाक कोना कशी द्यावी हे काही समजेना नात्यांच्या ह्या बाजारात कोण आपल हे मात्र उमजेना
जेव्हा जेव्हा तुझ्या कुशीत येऊन तुझ्या हृदयाचे ठोके ऐकत असते त्यावेळी ते मला जगातले सर्वात सुंदर गीत वाटते मग मी हळूच तुझ्या डोळ्यात बघून ते वाचण्याचा प्रयत्न करते नी कसली जादू त्यातही मला माझेच प्रतिबिंब दिसून जाते आणि नकळत हळूच माझ्या गालांवर लाली चढून मी लाजून जाते याची मात्र तुला जरा ही खबर नसते.....
Comments
Post a Comment