Posts

Showing posts with the label प्रेम

मैत्रीचे प्रेम...

मैत्रीचे प्रेम हे कधी पलीकडे गेले याचे भान हि मला राहिले नव्हते  मात्र मला हे कधीच पटवून देता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही अश्रू तुझ्या डोळ्यात असायचे  मात्र मन माझे हळवे व्हायचे  झालेला हळवेपणा मला कधी दाखवताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  कित्येक आठवणी साठवून ठेवल्या ,  प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या मात्र त्या कधी तुझ्या समोर मांडता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही बघताच तुला मन फुलून यायचं , सगळी कडे  आपला सुवास पसरून बेभान करायचं  त्या फुलांचा सुगंध तुला देताच आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  नकळत तुझ्याशी तासंतास बोलायची ,  दाटलेल्या भावनांशी झुंज माझी चालायची  ओठांवरचे शब्द तुझ्या कानापर्यंत पोहचवता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  होताच तुझा स्पर्श मला , थोडी लाजून जायची मी शहारलेल्या हात मग अलगद तुझ्या कडे सरकवयाची बिनधास्त तुझ्या मिठीत यायला मला कधी जमले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही

काय असत प्रेम ........

काय असत प्रेम ? नकळत कोणाला तरी आपले हृदय देऊन स्वतःला विसरणे  । चेहऱ्यावरील हावभाव लपवत स्वतःचे एक जग तयार करणे ।। म्हणजे प्रेम होय........ काय असत प्रेम? त्याला भेटण्यासाठी ची उत्कटता त्याला न सांगता अनुभावावी लागणे । त्याच्याच विचारात हळू हळू रात्री मात्र एका कड्यावरून दुसरी बदलणे  ।। म्हणजे प्रेम होय....... काय असत प्रेम ? कदाचित तो नसेल करत प्रेम माझ्यावर ह्या भावनांशी झुंज करणे  । होकार की नकार असेल ह्याच विचारांची डोक्यात गुंतागुंत होणे  ।। म्हणजे प्रेम होय........ काय असत प्रेम ? भूतकाळाशी नातं न ठेवता वर्तमान घालवण्यासाठी झालेली ती तळमळ । भाविष्यकाळा साठी स्वतःवर क्षणर्थात पाडलेली ती भुरळ ।। म्हणजे प्रेम होय .........