(अर्थ शब्दाचे ,स्वप्न आनंदाचे ,नाती मोलाची , भावना मनाची )
कैद...
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
कधी काळी व्यक्त होण्यासाठी तुला लिहून काढायची
आता मात्र तुझ्याकडे बघुन शब्द बंद झाली सुचायची
व्यक्त होताना तेव्हा शब्दात गुंतून जायची मी
आता मात्र तुझ्या डोळ्यात कैद होऊन जाते मी
जेव्हा जेव्हा तुझ्या कुशीत येऊन तुझ्या हृदयाचे ठोके ऐकत असते त्यावेळी ते मला जगातले सर्वात सुंदर गीत वाटते मग मी हळूच तुझ्या डोळ्यात बघून ते वाचण्याचा प्रयत्न करते नी कसली जादू त्यातही मला माझेच प्रतिबिंब दिसून जाते आणि नकळत हळूच माझ्या गालांवर लाली चढून मी लाजून जाते याची मात्र तुला जरा ही खबर नसते.....
Comments
Post a Comment