Posts

Showing posts with the label कथा

मी , तो आणि समुद्र ..... 3

Image
                                निल त्याच्या घरी पोहचतो.तिच्याच विचारात तो मग्न झालेला असतो तेच क्षणर्थात त्याला चक्कर येऊन तो खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो . निलच्या घरचे गोंधळलेल्या अवस्थेत डॉक्टरला बोलावून त्याची तपासणी करतात , आणि घरच्यांसमोर गंभीर असे सत्य बाहेर येते . हल्ली रोज निल स्वतः या दुःखांमध्ये सतत अस्वस्थ  असायचा , कारण घरच्या लोकांकडे त्याला द्यायला असा वेळच नसायचा .म्हणून कोणालाही न सांगता तो हे दुःख सहन करत होता , हे घरच्यांना कळताच सगळे घर हादरून जात . पण निल खंबीर होऊन सगळ्यांना सांभाळतो . तेवढ्यात डॉक्टर बोलतात निलकडे खुप कमी वेळ आहे साधारणतः १ ते २ महिने . तेवढ्यात निल खचून जातो , त्याच्या डोळ्यांसमोर लगेच सई चा चेहरा येतो . त्याचे वचने , त्याचे प्रेम , घालवलेले ते क्षण त्याच्या पुढे येऊन पावसाच्या सरी सारखे  बरसु लागतात .                                         ...

मी , तो आणि समुद्र ..... 2

Image
               त्या दोघी आता किनाऱ्याच्या दिशेने धावू लागल्या. सई अंतरा ला खेचून समुद्राच्या दिशेने घेऊन जात होती . रोजच्या जागेवर सई आणि अंतरा येऊन बसल्या आणि गप्पा करू लागल्या . अर्धा तास झालेला मात्र निलचा अजून पर्यन्त पत्ता नव्हता . तीचा उत्साह आता रागात रूपांतर करून गेला . कुठेय हा , आला का नाही , मुद्दाम तर  नसेल ना आला , पण आज काय झाले असेल?.......त्याला काही झाले तर नसेल ....(नाही नाही असे मनात ती पुटपुटली ). आता तिचा राग त्याच्या काळजीमध्ये बदले होते . ती व्याकुळ होऊ लागली , नानाप्रकारचे विचाराने तिचे मन भरून आले , १तास उलटून गेला होता . एव्हाना तो येऊन जातो मग आज काय झाले (सई अंतरा ला सांगत)? आज ती निराश झाली होती एकूण ४५ दिवसांमध्ये हे पहिल्यांदा घडले होते सई आणि निलची भेट झाली नव्हती . सई अंतरा ला म्हणत ....ऐकना!तू जा घरी मी थांबते थोड्यावेळ इथे, कदाचित तो आला नि मी इथे नसेल तर तो गोंधळून जाईल . अंतरा तिला विनवणी करू लागली नको तू चल आपण घरी जाऊन यावर बोलू . सई काही केल्या ऐकत नव्हती,शेवटी अंतरा तिथून निघून गेली .  ...

मी , तो आणि समुद्र .....

Image
                                                    सांजवेळ झाली एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता तर दुसरीकडे तिचे डोळे पाणावले होते . मधेमधे विजा कडकडत होत्या नि त्याच्या प्रकाशाने तिचे ते अश्रू मोत्याच्या मणीप्रमाणे चमकू लागली . एका हातात डायरी तर एका हातात पेन , मन भरून आले , डोक्यामध्ये हजारो प्रश्न रेंगाळत होती. बाल्कनीमध्ये बसल्यामुळे पावसाच्या सरी तिला स्पर्श करू बघत होत्या , हवेचे गार झुळूक तिला धक्का मारून आपली वाट काढत होते , क्षणार्थात मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला . नाही म्हणता म्हणता तिचे अश्रू अनावर झालेत आणि ती हळूहळू हुंदके देत ती डायरी वाचू लागली . जुनी डायरी आणि...... तिचे प्रेम याचे combination म्हणजे तिचे लिखाण आणि त्याची शब्द . आवडत नव्हते तिला लिहायला मात्र त्याच्यामुळे ती लिहायला लागली होती .गाणी ,कविता , चारोळी , शायरी हे सगळे त्याच्याकडून ती शिकली होती . भावना व्यक्त करू लागली होती . डायरीचे पाने ती एकापाठोपाठ वाचू लागली......."आज त्याच...

अव्यक्त झालेले प्रेम ....शेवटचा भाग

Image
                           पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार असे वातावरण झाले होते . या सोनेरी पावसात ह्या दोघांचे प्रेम जोमाने फुलत होते . पण कुठे तरी कमीपणा होता कारण यांच्या आयुष्यात आलेली त्याची ती , त्यामुळे दोघे हि थोडे मागेपुढे करत होते . एकीकडे पावसाने अख्ख्या परिसरावर राज्य गाजवले होते नि दुसरीकडे  यांच्या प्रेमाला नव्याने पालवी फुटू लागली होती  . बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आज कदाचित मला उशीर होईल , असे मनात फुटफूट तो कॉलेजची तयारी करू लागला . तो -  आज तिला सगळे काही सांगून मोकळा होतो , कारण माझं आयुष्य आता तिच्या बरोबर मला काढायचे आहे , पण ..... पण गार्गी चे काय ? (गार्गी हि त्याची ex gf ) हळूच श्वास रोखुन , पण मी का तिचा विचार करून ना , ती मला सॊडून गेली होती मी नाही . आज ती परत आली तर मी का माझं खरं प्रेम सोडू , आणि गार्गी वर माझं खर प्रेम असत तर स्वराचा नि माझा काहीच संबंध नसता. हे देवा ....!  डोक्याचा भुगा होण्याची वेळ आलीये आता माझ्यावर . असाच विचार करत करत त्याने आप...

अव्यक्त झालेले प्रेम .....भाग 2

Image
                                   आज कदाचित माझी नि तिची भेट व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना तो करू लागला , डोळ्यात नवी स्वप्न आणि मनात नवी आशा घेऊन तो कॉलेजसाठी तयार झाला . आज ती कॉलेजला येईल नि माझं तिच्याशी बोलणे  होईल असे त्याला मनोमंन वाटू लागले . रोज उशीरा येणारा तो आज अर्धा तास आधीच येऊन पोहचला . आज तो खुश आणि प्रसन्न दिसत होता , अचानक त्याला ती दिसली,  आज खुप गोड नि सुंदर दिसत होती ती , लाल ड्रेस , केस खुले सोडुन , चेहऱ्यावर स्मित हास्य , ओठांवर लाल लिपस्टिक , हिलची सॅन्डल , आणि मधून मधून पडणाऱ्या सुर्याच्या किरणाने अजुन तिचे रूप खुलवून गेले होते , "तेरी  याद  में  तबियत  "मचल"  जाती  है...!! वक़्त-ए-शाम की सूरत "बदल"  जाती है...!! जब तीर ख्यालों का "चुभता" है जिगर में...!! तो  मेरे सब्र  की नीयत  "पिघल" जाती है..."                             ...

अव्यक्त झालेले प्रेम .....भाग १

Image
                                              तो आतून खचलेला कारण पहिल्या प्रेमापासून मिळालेला  विश्वासघात  त्याला कदाचित पचवता आला नसावा म्हणून , हिरमुसलेला त्याचा चेहरा पाहताच क्षणी वाटणारी त्याची काळजी कुठे तरी तिच्या मनात जाऊन बसले होते . आज बोलावे उद्या बोलावे त्याच्याशी म्हणून ती धडपडत होती . ती मात्र एकदम बिनधास्त , मनात येईल तसे वागायचे . वाटेल तेव्हा कधी कोणाशी हि  मस्ती करायची  असा तिचा स्वभाव . मित्र मैत्रिणी नि घेरलेली  . अगदी आनंदात नि कुठल हि टेन्शन न घेणारी अशी ती . चुकून तो तिच्या नजरेस पडला . जरा विचित्र पण गोड असा तो ,त्याचे मात्र तिच्या कडे लक्ष नव्हते . कारण तो " दर्द भरे मैफिल को हि अपनी जिंदगी मानने लगा था।  "            हि मात्र रोज त्याला नोटीस करू लागली , आज कदाचित त्या वेड्याचे  लक्ष तिच्याकडे जाईल नि हि त्याला आपली गोड नि स्मित हास्यानी त्याच्य...