अव्यक्त झालेले प्रेम ....शेवटचा भाग

                           पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार असे वातावरण झाले होते . या सोनेरी पावसात ह्या दोघांचे प्रेम जोमाने फुलत होते . पण कुठे तरी कमीपणा होता कारण यांच्या आयुष्यात आलेली त्याची ती , त्यामुळे दोघे हि थोडे मागेपुढे करत होते . एकीकडे पावसाने अख्ख्या परिसरावर राज्य गाजवले होते नि दुसरीकडे  यांच्या प्रेमाला नव्याने पालवी फुटू लागली होती  . बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आज कदाचित मला उशीर होईल , असे मनात फुटफूट तो कॉलेजची तयारी करू लागला .

तो - आज तिला सगळे काही सांगून मोकळा होतो , कारण माझं आयुष्य आता तिच्या बरोबर मला काढायचे आहे , पण ..... पण गार्गी चे काय ? (गार्गी हि त्याची ex gf ) हळूच श्वास रोखुन , पण मी का तिचा विचार करून ना , ती मला सॊडून गेली होती मी नाही . आज ती परत आली तर मी का माझं खरं प्रेम सोडू , आणि गार्गी वर माझं खर प्रेम असत तर स्वराचा नि माझा काहीच संबंध नसता. हे देवा ....!  डोक्याचा भुगा होण्याची वेळ आलीये आता माझ्यावर . असाच विचार करत करत त्याने आपली बाईक काढली आणि कॉलेजसाठी निघाला . मुसळधार पाऊस  कोसळत असल्यामुळे कॉलेजच्या गेट वर कोणाचा पत्ता नव्हता , तो - आली असेल ना ती आज ? नसेल आली तर सरळ जातो तिच्या घरी . नको नको उगाच काही लोच्चे व्हायचे बाबा !! . तो कॉलेजच्या कॉर्नर ला उभा होता तेवढ्यात ती त्याला दिसली . त्या पावसात ती त्या दिवसापेक्षा अजून गोड दिसत होती , तिचे अंग ओलेचिंब झाले होते . सरी चा थेंब तिच्या गालाच्या खळी बरोबर लपंडाव खेळत होता . तिला कदाचित पाऊस आवडत असा म्हणून ति काही हि विचार न करता पावसात भिजत  होती . हवेचा तो गार वारा तिच्या केसाबरोबर मस्करी करत होता  , याला मात्र त्याची चीड होऊ लागली , कारण तिच्यावर फक्त माझा हक्क आहे असे त्याला वाटत होते  . किती मी वेडा काही पण आपली बडबडत करत असतो .

       ती हसत खेळत त्या पावसाच्या सरी हातात झेलत होती , नि मध्ये डबके दिसेल तिथे उड्या मारत होती , हे तिचे रूप त्याने नव्याने पाहिले होते , म्हणून तो तिच्या अजूनच प्रेमात पडला  . स्वराचे लक्ष त्याच्याकडे जाताच ती जरा सावरली आणि आपली हळुहळु येऊ लागली . ती - अरे देवा ... हा ! याने पाहिले बहुतेक माझा बालिशपणा , काय मी वेडीच बाबा  , तो काय विचार करत असेल माझ्या बद्दल , छे बाबा काय मी पण ना !! , असो मी गपगुमाणे निघून जाते . ती त्याच्या समोरून निघू लागली , तेवढ्यात ,


तो - वाह ! काय दृश्य होते ते .
ती - (लाजत आणि मुद्दाम चेहऱ्यावर राग आणून )
तो - काय झाले , असे काय बघत आहे माझ्याकडे.
ती- दृश्य म्हणजे कुठले दृश्य ?
तो - अग मी पावसाच्या सरी बद्दल बोलतोय , एक min तुला काय वाटले ? छे छे किती तो विचार देवा देवा .
ती - ओये , मी नाही हा केला काही विचार .
तो - हो का , बर (आणि तो तिथून निघून गेला )
                             हे जे काही घडत होते ते सगळे गार्गी बघत होती तिला माहिती झाले होते , पार्थ , स्वराकडे वळल्या जातोय , आणि हे तिला पचत नव्हते ,ती रागात येऊ,  आज मी स्वराशी बोलणार, बजावणार तिला कि पार्थ फक्त माझा आहे नि दूर रहा त्याच्या पासून .तेवढ्याच तातडीने तिने स्वराला गाठले ,गार्गी - अग ये , हा तुच , काय ग , काय चालय तुझे .
स्वरा- (थोडी घाबरून आणि आश्चर्यचकित होऊन ) का ?काय झाले .
गार्गी - काय झाले , अजून मलाच विचारतेय . (थोडी थांबुन )मी पार्थ बद्दल बोलतेय , काय चालू होते तुझे , मला दिसतेय हा सगळे .
स्वरा - अग हो पण मी कुठे काय केले , नि हा तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो तु पार्थ बरोबर बोल , मला का उगाच मधे आणतीये . (तिथून निघून जाताच गार्गी तिचा हात पकडते )
"अग काय हे ?"
गार्गी - तू मला नको शिकऊस हा .
                      तेवढ्यात पार्थ आला  नि गार्गी चा हात पकडुन तिथून तिला घेऊन जातो . गार्गी चा हात पार्थ ने पकडताच स्वराचा उतरलेला चेहरा बघून मात्र पार्थ च्या ओठांवर हसु आले.
पार्थ - काय होते हे सगळे? (तो रागात )
गार्गी - काय म्हणजे , तिचा ना तुझ्यावर डोळा आहे .
पार्थ - (खोटं हसुन ) डोळा नाही प्रेम आहे तिचे माझ्यावर नि हा ते तुला नाही कळणार कारण ती पळकुटी नाही तुझ्या सारखी  तर please तू राहुदे नि जा इथून  .
गार्गी - अरे पण माझं पण प्रेम आहेच ना म्हणून तर मला त्रास होत आहे  .
पार्थ - तुला त्रास होत आहे कारण , तुला जे हवे आहे ते मिळत नाहीये म्हणून , तर जा इथून नि हा अजुन एक , माझं पण स्वरावर प्रेम आहे . झाले समाधान . रस्ता तुझ्यासाठी मोकळा आहे , ( गेट च्या दिशेने  हात दाखवत तो रागाने तिथून निघून गेला ).

                                      इकडे मात्र  स्वराचे अश्रू काही थांबत नव्हते . आणि स्वतःशी च बडबड करत हा बरोबर ना ती त्याची gf आहे नि तो तिच्यावरच हक्क दाखवणार मी कोण ना , पावसाच्या थेंबां बरोबर तिचे अश्रू एकरूप होत होते . तेवढ्यात पार्थ तिच्या समोर येऊन उभा राहतो , रडतीये कि पावसाचे थेंब , हे ऐकताच ती उठून निघून जाते , एक हि क्षण वाया न घालवता पार्थ त्याची मराठी कविता  सुरु करतो .

""बेधुंद त्या पावसात भिजायचं होते मला फक्त 
भिजायचं नाही तर चिंब होऊन नाचायचे होते
एक एक थेंबाना हातावर गोंजारायचे होते
 नि गार गार टपोरी थेंबांशी  खेळायचे होते 
त्या सुसाटाच्या वाऱ्या मध्ये उडायचे होते 
नि अंगावर येणारे शहारे अनुभवायचे होते 
तो  क्षण मला तुझ्या समेत घालवायचा होता
तो क्षण मला आयुष्य भर जपून ठेवायचा होता
हळूच होणारा तुझा तो स्पर्श नकळत मनात
 उदभवणारे त्या भावनांशी एकरूप व्हायचे होते 
विजा कडाडल्या वर तुझे ते मिठीत येणे आणि 
प्रेमाने केसांवरून हात मी फिरवावे हे अनुभवायचे होते
हो ग वेडा बाई बेधुंद त्या पावसात भिजायचं होते मला फक्त 
भिजायचं नाही तर चिंब होऊन नाचायचे होते. ""
                           हे ऐकताच ती पुर्ण पणे त्यात हरवून गेली . त्या पावसाने त्यांना एक अनोखा आणि अविस्मरणीय क्षण देऊ केला होता . स्वरा लाजेने गुलाबी होऊन गेली होती नि तिचे ते लाजणे बघायला तो वेडा झाला होता . तो रोमांचिक क्षण त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणार होता . काही वेळात आकाश निरभ्र असे निळसर झाले , पाऊस हळुहळु कमी झाला , मधेच सुर्य , ढगाळलेल्या त्या काळभोर ढगांमधून वाकवल्या दाखवत सर्वांच्या समोर येऊ लागला . अगदी  सगळीकडे शांतता पसरलेले होते  . पावसाचे थेंब झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झोका घेत होती , त्या गार वाऱ्यामुळे टुमदार झाडी आपले अंग हलवत आनंद घेत होती. आणि तोच गारवारा त्या दोघांना भिडुन गेला .

            हळूच्या त्या क्षणी तिचा हात पकड तो आपल्या गुढघ्यावर बसून आपले प्रेम व्यक्त करणार होता . तो : तुझा हात दे जरा
ती-का ?
तो - अग राणी दे कि
ती - मी का म्हणून देऊ, जा कि तुझ्या त्या गार्गी जवळ .
तो -  (थोडा चिडून )देणार कि जबरदस्ती करू .
ती- एवढी हिम्मत आहे का ?
तो- बघायची आहे?
ती - हो .
तो- ohk थांब (अख्ख्या लोकांना जमवत)" सुनो गाव वालो इस लडकी से मैं प्यार करता हूं लेकिन ये मान हि नही रही "
ती- ओये ! गप चल इथून .
तो- तिला हळूच स्वतः जवळ ओढत नि रोमँटिक होऊन love u यार .
ती- अच्छा कधी पासून .
तो- जेव्हा तू पहिल्यांदा मला पाहिले होतेस तेव्हा पासून .
ती - म्हणजे तुला माहिती होते हे सगळे .
तो - वेडी ! तिच्या गालावर चुंबन घेत ,हो
ती - (लाजून लाल झाली) मग बोललास का नाही ?
तो - हिम्मत नव्हती रे !!
ती - मग आता ?
तो- काय आता ?
ती- आता काय पुढे.
तो - काही नाही झाले सगळे .
ती - (रागात)बर जाऊ मी,
तो- हा !!
ती- नक्की !!
तो- होय नि तिचा हात अजून घट्ट करत.
ती- (प्रेमाने त्याच्या कडे बघत) काय बोलायचं बोल .
तो- लग्न करूया का?
ती-(आश्चर्यचकित होऊन) वेड लागलय तुला .
तो- हळूच आपल्या खिशा मधून अंगठी काढत तिच्या बोटात टाकू लागला .
ती- (आनंदाने  रडत त्याला घट्ट मिठी मारते) नि त्याला "हो" बोलते
                             हे सगळे दृश्य सगळे कॉलेज बघत होत नि त्यात गार्गी चा पण समावेश होता . हळूच गार्गी च्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झालीत . पण पार्थला  आनंदात बघून ती थोडी पुढे येऊ  sorry पार्थ आणि स्वरा तुला पण . यार तुम्ही परफेक्ट आहेत एकमेकांसाठी असेच रहा आयुष्यभर  . नि डोळे पुसत ती तिथून निघून गेली ,इकडे पार्थ नि स्वरा हातात हात घेऊन नि स्वरांनी आपले डोके पार्थच्या खांद्यावर टाकत आपल्या पुढच्या आयुष्याचा विचारत करत करत कॉलेजच्या गेट मधून बाहेर पडले


Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3