अव्यक्त झालेले प्रेम .....भाग १

                                              तो आतून खचलेला कारण पहिल्या प्रेमापासून मिळालेला विश्वासघात त्याला कदाचित पचवता आला नसावा म्हणून , हिरमुसलेला त्याचा चेहरा पाहताच क्षणी वाटणारी त्याची काळजी कुठे तरी तिच्या मनात जाऊन बसले होते . आज बोलावे उद्या बोलावे त्याच्याशी म्हणून ती धडपडत होती . ती मात्र एकदम बिनधास्त , मनात येईल तसे वागायचे . वाटेल तेव्हा कधी कोणाशी हि  मस्ती करायची  असा तिचा स्वभाव . मित्र मैत्रिणी नि घेरलेली  . अगदी आनंदात नि कुठल हि टेन्शन न घेणारी अशी ती . चुकून तो तिच्या नजरेस पडला . जरा विचित्र पण गोड असा तो ,त्याचे मात्र तिच्या कडे लक्ष नव्हते . कारण तो "दर्द भरे मैफिल को हि अपनी जिंदगी मानने लगा था। "  


        हि मात्र रोज त्याला नोटीस करू लागली , आज कदाचित त्या वेड्याचे  लक्ष तिच्याकडे जाईल नि हि त्याला आपली गोड नि स्मित हास्यानी त्याच्याशी मैत्री करेल, असे तिला वाटत होते .एकीकडे तो त्याच्या दुःखात आपले दिवस मोजत होता नि दुसरी कडे मात्र हिच्या मनात त्याचा विचार चालू होता . का बरं हा असा आहे ? मेल्या थोडं बघत पण नाही माझ्या कडे ! ती हळूच मनात बोलू लागली . अजून तो  ह्या गोष्टीं पासून लांब होता . त्याला त्याच्या आजूबाजूला काय चालू याचे सुद्धा चाहूल नव्हती ,मग हिच्याकडे बरें कसे लक्ष जाईल ना ! 
              हळूहळू तिचे मन काही केल्या ऐकत नव्हते . हे देवा कसे होणार माझे काय चालू आहे . का मी एवढा त्याचा विचार करत आहे . ती आज कॉलेज ला गेली नव्हती , कारण तिला तशी इच्छा नव्हती . रोज चे मित्र- मैत्रिणींशी बोलणे आता तिला नकोसे  वाटू लागले  . सतत तिच्या विचारांनी घरचे पण त्रासले होते . "काय हि ?  अशी का वागत आहे? " आई चे शब्द तिच्या कानी पडले . ती - अग आई ! काय ! कुठे काय , काही तर नाही . आई - हो ना ! मग आज कॉलेज ला का नाही गेलीस  , काही झाले का ? 
ती - नाही ग आई ! काहीच नाही , सहज आपले घरी थांबली .
आई- बर बाबा ! तुझी ईच्छा .
आई रूम मधून निघून गेली , आणि ती परत त्याच्या विचारात मग्न झाली . 

                           इकडे कॉलेज मध्ये नेहमी प्रमाणे तो आला . पण आज त्याला ती दिसली नव्हती . आज तिच्या गृप मध्ये ती अदृश्य होती . सगळे तिच्या बद्दल बोलत होते की आज ती का नाही आली . हे संभाषण तो ऐकत होता . तो नकळत तिच्या जुन्या खोडकर स्वभावामध्ये रमुन  गेला . कुठे तरी तो परत हिरमुसला गेला  . कारण थोडं का होईना तो तिच्या मुळे नकळत हसत होता .हे मात्र तिला माहिती नव्हते . त्याचे डोळे तिच्या येणाऱ्या रस्त्याकडे टिपले होते , पण ती अजून पर्यन्त आली नव्हती . हळूहळू त्याला मात्र  याचा त्रास होऊ लागला , तो अस्वस्थ झाला  कारण रोजची नेहमी दिसणारी ती व्यक्ती आज त्याच्या डोळ्यासमोर नव्हती . नि महत्वाचे म्हणजे हे दुःख तो कोणाला सांगू शकत नव्हता कारण त्याचे असे आपली  मानणारी एक पण व्यक्ती त्याच्या आयुष्यात नव्हती . कॉलेज चा तो दिवस  संपायला आला  मात्र तिची अजून पर्यन्त काहीच खबर नाही हे बघून त्याने आपलेच काही तरी चुकले असावे असे गृहीत पकडले . 

पण तो थोडा confuse  होता की ती नसण्याने किंवा असण्याने मला का फरक पडत आहे , असे अचानक का म्हणून मी तिचा विचार करायला लागलो . का माझे डोळे तिला शोधण्यासाठी तडफडत आहे , माझे मन का तिच्या कडे ओढल्या जात आहे , मन तर मन पण डोळे का तरसायला लागलेत तिला पाहायला . हे काय होतंय नि का ? असे हजारो प्रश्न त्याच्या डोक्यात रेंगाळत होती . 


                   आज चा दिवस संपला,  तो हताश होऊन त्याच्या रूम वर येऊन पडला नि हि इकडे त्याच्या विचारात जेवण वैगेरे विसरून बेड वर पडून होती . साधारणतः एक महिना असाच गेला , ना त्यांचे बोलणे होते नि ना हि त्यांचे एकमेकाला भेटणे . ती कॉलेज ला यायची तेव्हा थोडं का होईना  हि दोघे एकमेकांच्या नजरेसमोर असायची  . आता मात्र त्याला राहावत  नव्हते , रोज तिची वाट बघून तो दमला होता .नि इकडे ती त्याला काही केल्या विसरत नव्हती , ती पण त्यात गुंतली हे त्याला माहिती नाही व्हावं म्हणून ती कॉलेज ला जात नव्हती . दोघे हि एकमेकांच्या प्रेमापासून वंचित होते , कोणाच्या मनात काय चालले हे त्या दोघांना ठाऊक नव्हते म्हणून कुठे तरी ते त्या दडपणाखाली  आले  . अचानक एक दिवस त्याच्या लक्षात आले , कि जिच्या प्रेमासाठी मी काल पर्यन्त भांडत होतो आणि  जेल कैदी सारखा स्वतःला कोंडून ठेवले होते ती तर आता कुठे माझ्या आयुष्यात दिसत नाहीये  ,हा च  विचार करत तो झोपी गेला . . 

   क्रमक्ष : 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3