Posts

Showing posts from July, 2015

होय ते प्रेमच होते....

होय ते प्रेमच होते मैत्रीचे नाव देऊन माझे प्रेम निभवत होते खट्याळ तुझ्या चेहऱ्यांवर हसु फुलवून मी माझ्याच भावनांशी झुंजत होते पाहताच तुला आठवला तो पाऊस आठवल ते ढगाळलेल आकाश वाटायला लागले गर्जेल नव्याने गीत गात एकाच वाटेने लागले चालू सवांद आपल्यात नाही तर आपल्या मनाचा लागलाय होउ कधी डोळे तर कधी मन मात्र ओठांवरून शब्दच नाहीसे झाले पाऊस तर एक निमित्त होते होय ते प्रेमच होते 

नव्याने प्रेमात पडून .....

नव्याने प्रेमात पडून नव्याने जगायला शिकले जुने स्पंदने हृदयाचे हरवून एक नविन स्पंदने निर्माण झाले हे मन कधी आकाशात उडू पाहते तर कधी वाहत्या पाण्यात बुडु पाहते हॄदयाचा नि मनाचा झालाय सवांद सुरु नसलास जेव्हा तू हे डोळे आसुसलेले असतात पाहायला तुला असलास जवळ तू हळूच पाहताक्षणी तुला अलगद पापण्या लाजुन खाली झुकतात हळूच गालांवरचा रंग गुलाबी होतो नि ओठांवर तुझेच नाव येते 

रंग...

इंद्रधनुष्याचे रंग आयुष्याच्या रंगांमधे मिसळू लागले आणि मी  तुझ्यात गुंतू लागली जीवनाचे गीत नव्याने लिहायला घेतली सुरुवात प्रेम या शब्दाने केले कधी स्वप्नात तर कधी बोलण्यात नकळत तुझाच होतोय भास क्षणोक्षणी जागोजागी होउ लागलाय तुझाच आभास हळूच हृदयाचे स्पंदने परकी वाटायला लागली नकळत तुझ्याच स्वप्नात रंगु लागली