Posts

Showing posts from 2017

पाऊस ...

येतात ढग दाटुनी डोकावतात थेंब नभातुनी साद घालतो गंध मातीचा न्हाऊनी निघाला परिसर सारा नाचती मोर फुलवून पिसारा रेंगाळले गाणी आयुष्याची ओठी झालीत बेभान सगळे लहान मोठी .....

शाळेच्या त्या आठवणी .....

रेंगाळल्या जुन्या गोष्टी शाळेच्या त्या आठवणी कट्टी -दो चा चाले खेळ सारा भांडायचो तो घसरकुंडीच्या रांगेत उभे राहायला सुटताच शाळा , पळायचो धडपड़ायचो तो त्या मातीच्या चिखलात कधी मामा च पत्र तर कधी लागायचा लगोरीचा डाव आणि आनंद व्हायचा तो बनवतानि  कागदी विमाने आणि नाव ........

मैत्रीचे पुस्तक....

नकळत मैत्री नावाचे पुस्तक उघडकीस आले . . .  प्रस्तावना मध्ये मैत्रीची  व्याख्या लिहिली गेली  . . .  अनुक्रमणिका मैत्रीचा  उल्लेख  दर्शवू लागली . . .  प्रारंभ झाला तो पहिल्या गध्याचे . . .  हळूच गुणगुणले ते हळवे बोल पद्याचे . . .  देऊ लागले कधी स्पष्टीकरण . . .  तर कधी सोडवू लागले मनाचे व्याकरण . . . 

फक्त तूच ...

त्यादिवशीची  आपली भेट मनात भिडून गेली थेट आजही तुझाच विचार मनात येतो किती आपण एकमेकांच्या जवळ होतो तुझ्या प्रत्येक शब्दात माझी काळजी कळायची तुझ्या प्रत्येक हसऱ्या ओठांवर फुले उमलायची आज परत तुला भेटावसं वाटले मनातले सगळं सांगुन टाकावंस वाटले बघता बघता तुझी ओढ लागत गेली आणि पुन्हा तुझ्या ओठां मधून ती शब्द ऎकावीशी वाटली

मनातील शब्द . . .

मनातील  शब्द . . .  नाती वाळू  वर लिहा अथवा मनामधे अर्थ तोच वाळू वर लिहिलेली नाती समुद्राच्या लाटेने वाहून जाईल मात्र मनात लिहिलेली नाती कायम स्वरूपी आठवणीत राहतील नात्यांमधे गुंतायला वेळ लागत नाही वेळ लागतो तो नाती समजायला मनाच्या एकांत आणि हृदयाचे ठोके आज असे काही वाढू लागले की जणू काही पावसामधला तो पाण्याचा थेंब जमिनीवर यायला तरसु लागला जसे त्या थेंबाचे नि जमिनीचे नाते वर्षानुवर्षे असावा नाती असतात पण माहिती नसतात अफाट अश्या या भयान जगात असत कोणी तरी आपले असत कोणी तरी अगदी जवळच प्रेमाच्या भाषेला मनाच्या भावनेचा आधार जसा भव्य सागराला किनाऱ्याचा आधार

चाहुल...

चाहुल लागली नव्या प्रेमाची  सुरूवात झाली एका अध्यायाची  कल्पने पलीकडच्या नात्याची  डोळ्यातील लाजऱ्या स्वप्नांची  भावपुर्ण लाभली साथ तुझी  मी न राहिले स्वतः माझी  ओठांवर उमटू लागला  शब्द तुझ्याच नावाचा  आस लागली तुझ्या  हातात हात असण्याचा 

जुने दिवस....

नाही म्हणता म्हणता आठवले दिवस जुने .. गोष्टी बालपणाची  आणि जाणीव झाली खोडकरपणाची .... उभारले दृश्य ती गल्लोगल्ली फिरकी मारलेली .... कधी काळी उमजली नाती या बोबड्या शब्दांनी .... अजुनही  ती रस्ते वाटती आपुलकीची ..... नदीच वाहत पाणी जणू वाटे लखलखती हिऱ्याची चादरच .... आता सुद्धा शाळेची घंटा आणि ब्लैक बोर्ड आपले अस्तित्व गाजवत होती .....