Posts

नवीन पोस्ट

कैद...

  कधी काळी व्यक्त होण्यासाठी तुला लिहून काढायची आता मात्र तुझ्याकडे बघुन शब्द बंद झाली सुचायची व्यक्त होताना तेव्हा शब्दात गुंतून जायची मी आता मात्र तुझ्या डोळ्यात कैद होऊन जाते मी

सासर ...

 अलक : तिच्या मनाची झालेली घालमेल बघून  त्यानेच त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ टाकले  कारण सासरी जाणारी प्रत्येक मुलगी राजवाड्यात मोठी झालेली नसते,  हे त्याला चांगलेच ठाऊक होते............

मैत्रीचे प्रेम...

मैत्रीचे प्रेम हे कधी पलीकडे गेले याचे भान हि मला राहिले नव्हते  मात्र मला हे कधीच पटवून देता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही अश्रू तुझ्या डोळ्यात असायचे  मात्र मन माझे हळवे व्हायचे  झालेला हळवेपणा मला कधी दाखवताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  कित्येक आठवणी साठवून ठेवल्या ,  प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या मात्र त्या कधी तुझ्या समोर मांडता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही बघताच तुला मन फुलून यायचं , सगळी कडे  आपला सुवास पसरून बेभान करायचं  त्या फुलांचा सुगंध तुला देताच आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  नकळत तुझ्याशी तासंतास बोलायची ,  दाटलेल्या भावनांशी झुंज माझी चालायची  ओठांवरचे शब्द तुझ्या कानापर्यंत पोहचवता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  होताच तुझा स्पर्श मला , थोडी लाजून जायची मी शहारलेल्या हात मग अलगद तुझ्या कडे सरकवयाची बिनधास्त तुझ्या मिठीत यायला मला कधी जमले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही

मी , तो आणि समुद्र ..... 3

Image
                                निल त्याच्या घरी पोहचतो.तिच्याच विचारात तो मग्न झालेला असतो तेच क्षणर्थात त्याला चक्कर येऊन तो खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो . निलच्या घरचे गोंधळलेल्या अवस्थेत डॉक्टरला बोलावून त्याची तपासणी करतात , आणि घरच्यांसमोर गंभीर असे सत्य बाहेर येते . हल्ली रोज निल स्वतः या दुःखांमध्ये सतत अस्वस्थ  असायचा , कारण घरच्या लोकांकडे त्याला द्यायला असा वेळच नसायचा .म्हणून कोणालाही न सांगता तो हे दुःख सहन करत होता , हे घरच्यांना कळताच सगळे घर हादरून जात . पण निल खंबीर होऊन सगळ्यांना सांभाळतो . तेवढ्यात डॉक्टर बोलतात निलकडे खुप कमी वेळ आहे साधारणतः १ ते २ महिने . तेवढ्यात निल खचून जातो , त्याच्या डोळ्यांसमोर लगेच सई चा चेहरा येतो . त्याचे वचने , त्याचे प्रेम , घालवलेले ते क्षण त्याच्या पुढे येऊन पावसाच्या सरी सारखे  बरसु लागतात .                                                          दुसरीकडे  सईला मात्र याची काहीच कल्पना नसते. ती आपली स्वप्न सजवण्यात एवढी मग्न होते की आपले घर कसे असणार , आपण कुठे राहणार हे सुद्धा तिने ठरवून घेतले होते . शिवाय तिच्या नि निलबद्दलच्या नात

मी , तो आणि समुद्र ..... 2

Image
               त्या दोघी आता किनाऱ्याच्या दिशेने धावू लागल्या. सई अंतरा ला खेचून समुद्राच्या दिशेने घेऊन जात होती . रोजच्या जागेवर सई आणि अंतरा येऊन बसल्या आणि गप्पा करू लागल्या . अर्धा तास झालेला मात्र निलचा अजून पर्यन्त पत्ता नव्हता . तीचा उत्साह आता रागात रूपांतर करून गेला . कुठेय हा , आला का नाही , मुद्दाम तर  नसेल ना आला , पण आज काय झाले असेल?.......त्याला काही झाले तर नसेल ....(नाही नाही असे मनात ती पुटपुटली ). आता तिचा राग त्याच्या काळजीमध्ये बदले होते . ती व्याकुळ होऊ लागली , नानाप्रकारचे विचाराने तिचे मन भरून आले , १तास उलटून गेला होता . एव्हाना तो येऊन जातो मग आज काय झाले (सई अंतरा ला सांगत)? आज ती निराश झाली होती एकूण ४५ दिवसांमध्ये हे पहिल्यांदा घडले होते सई आणि निलची भेट झाली नव्हती . सई अंतरा ला म्हणत ....ऐकना!तू जा घरी मी थांबते थोड्यावेळ इथे, कदाचित तो आला नि मी इथे नसेल तर तो गोंधळून जाईल . अंतरा तिला विनवणी करू लागली नको तू चल आपण घरी जाऊन यावर बोलू . सई काही केल्या ऐकत नव्हती,शेवटी अंतरा तिथून निघून गेली .                       सई एकटक समुद्राच्या ला

मी , तो आणि समुद्र .....

Image
                                                    सांजवेळ झाली एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता तर दुसरीकडे तिचे डोळे पाणावले होते . मधेमधे विजा कडकडत होत्या नि त्याच्या प्रकाशाने तिचे ते अश्रू मोत्याच्या मणीप्रमाणे चमकू लागली . एका हातात डायरी तर एका हातात पेन , मन भरून आले , डोक्यामध्ये हजारो प्रश्न रेंगाळत होती. बाल्कनीमध्ये बसल्यामुळे पावसाच्या सरी तिला स्पर्श करू बघत होत्या , हवेचे गार झुळूक तिला धक्का मारून आपली वाट काढत होते , क्षणार्थात मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला . नाही म्हणता म्हणता तिचे अश्रू अनावर झालेत आणि ती हळूहळू हुंदके देत ती डायरी वाचू लागली . जुनी डायरी आणि...... तिचे प्रेम याचे combination म्हणजे तिचे लिखाण आणि त्याची शब्द . आवडत नव्हते तिला लिहायला मात्र त्याच्यामुळे ती लिहायला लागली होती .गाणी ,कविता , चारोळी , शायरी हे सगळे त्याच्याकडून ती शिकली होती . भावना व्यक्त करू लागली होती . डायरीचे पाने ती एकापाठोपाठ वाचू लागली......."आज त्याची नि तिची भेट झाली . थोडा आगाऊ पण मनाने चांगला वाटत होता , (त्याच्या स्वप्नात रंगून)  त्याच्या खोडकर स्वभावामुळे कदाचित ती त

भुरळ...

विरहाचे लिहायला मला कधी जमलेच नाही... तू आयुष्यात नसणे मला कधी पटलेच नाही ...... तुझ्यामुळे पडलेली भुरळ कशी बरे विसरेल मी..... सात रंगाने रंगलेले आयुष्य माझे कसे बरे पुसेल मी....