तुझी कुशी .......
जेव्हा जेव्हा तुझ्या कुशीत येऊन तुझ्या
हृदयाचे ठोके ऐकत असते
त्यावेळी ते मला जगातले
सर्वात सुंदर गीत वाटते
मग मी हळूच तुझ्या डोळ्यात
बघून ते वाचण्याचा प्रयत्न करते
नी कसली जादू त्यातही मला
माझेच प्रतिबिंब दिसून जाते
आणि नकळत हळूच माझ्या
गालांवर लाली चढून मी लाजून जाते
याची मात्र तुला जराही खबर नसते.....
अप्रतिम ...
ReplyDelete