Posts

Showing posts from March, 2015

जाणीव

नाती  टिकवण्याचे कौशल्ये होते  नाती बनवण्याचे गुण होते माझ्या मनाची जाणीव होती त्याला माझ्या ह्रदयाची काळजी होती त्याला मी तुझ्यावर प्रेम करतो असे कधी न म्हणता सतत माझ्या वर प्रेम करत होता माझ्या मनात मी त्याची प्रतिमा केली असे टिकावे तुझे नु माझे नाते असे देवाकडे प्रार्थना केली भीती वाटायला लागली मला वाटते कि हरवून बसेल तुला

निसर्ग....

 निसर्ग पाहता पाहता झाले मी निसर्गाच्या स्वाधिन विसरून घर परिवार रमले मी तुझ्या कुशीत मऊ आणि थंड तुझी कुशी जशी आहे आईची कुशी दूरवर गेले ,नाही भेटले मला कोणी भय नव्हते मला कारण मी तर होते तुझ्या कुशीत असे वाटते राहून जावे तुझ्या समेत दिर्घकाळ ..........

नाती ............

आयुष्यात काही नाती रक्तापलीकडली असतात जीवनाच्या या प्रवासमध्ये अशी नाती क्वचित भेटतात मनाच्या या समुद्रामधे वाळूपेक्षा मोतीच जास्त साठवले जातात अमावसेला नसलेला चंद्र पण गालातल्या गालात हसून मोकळा होतो तशीच ही नाती आपलेसे करून घेतात चंद्राला पण ईर्ष्या होईल अशी चंद्रापेक्षा पांढरे शुभ्र मन असलेली काही नाती जीवनात मिळतात                             

आपुलकी..............

कविता सुचाव्या असे विषयच उरले नाही विषय सुचला तरी शब्द मात्र फुटत नाही             शब्द सुचला तर             अर्थ निघत नाही             नि अर्थ जुळला तर             भावना तश्याच कोरड्या ओलावा मिळतो तो फ़क्त आपुलकीचा मात्र ही आपुलकीच करणारे जीवनात भेटत नाही            भेटले तरी नाही त्या            आठवणी देऊन जातात            नि शेवटी काय            आयुष्यात फ़क्त आठवणीच राहतात

निमित्त ....

हवय निमित्त मला तुझ्याशी भांडायला हवय निमित्त मला तुझे गालगुच्चे ओढायला हवय निमित्त मला तुझ्या डोळ्यात मला शोधायला हवय निमित्त मला नकळत मला बघता क्षणी तुझ्या चेहऱ्या वरील उजळलेले तेज बघायला हवय निमित्त मला तुझ्या हृदयाचे ठोके ऐकायला हवय निमित्त मला तुझ्या आयुष्यात हसू फुलवायला हवय निमित्त मला तुझे आयुष्य सावरायला हवय संधी  मला

ती......

  ती बेधुंद नजरेने बघत होती आणि मी माझ्या नजर चुकवीत होतो जाणीव होती मला आणि समजुन घ्यायचे होते तिला तिची वाट  मला तिच्याकडे ओढू लागली माझ्या मनात तिची जागा वाढू लागली दिशा बदलावी सुर्याची तसा मी माझी दिशा चुकवु लागलो मात्र मनापासुन तिच्या वर प्रेम करू लागलो तिचे ते ओठ जणु मला बोलावताहेत तिचे ते डोळे जणु मला शोधताहेत विचारात पडावे तसा मी तिच्या प्रेमात पडलो गर्दीत ती एकटी वाटत होती आणि मला तिची काळजी वाटत होती गोड तिचे हसु त्यामध्ये मला काही कमी वाटत होती

मैत्री

मैत्री तर हजारो मिळतात मात्र मनात काहीच घर करून जातात फुलाला रंग यावा तसा हा मैत्रीचा रंग खुलतो कळी कधी फुल बनतो नि कधी सुगंध पसरवतो हे कळायला पण  नाही येत तोडायला जावो तर त्याचा मऊ स्पर्श आणि सुगंध आपल्याला मोहात पाडतो नि मनात असलेला कडवटपणा घालवतो

तुझ्या आयुष्यात ...........

हरवुन तुझ्या गोष्टी मध्ये भामबावरून तुझ्या डोळ्यां मध्ये आले ओठी शब्द बघताक्षणी तुला मी झाले निशब्द नको नको म्हटले माझे मन नको नको म्हटले माझे मन .....तुला शेवटी जे काही केले या वेडया मनाने  केला हवी आहे तुझी साथ मला कधी पडताना सावरायला तर कधी नकळत मनामधले जाणुन घ्यायला

भाषा प्रेमाची

प्रेमाला नसते भाषा असते फक्त नि फक्त भावना भावनाला नको असते शब्द ते तर डोळेच सांगुन जातात प्रेमात ओठांची नसते गरज असते फक्त एक  नजर मनातले नुसत शब्द नाही तर तो एक अश्रूचा थेंब सांगुन जातो क्षणार्थात पाखरू होऊन कधी फुलां वर बसतो हे विसरायला पडत नात तिखट गोड बनत