(अर्थ शब्दाचे ,स्वप्न आनंदाचे ,नाती मोलाची , भावना मनाची )
भाषा प्रेमाची
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
प्रेमाला नसते भाषा असते फक्त नि फक्त भावना भावनाला नको असते शब्द ते तर डोळेच सांगुन जातात प्रेमात ओठांची नसते गरज असते फक्त एक नजर मनातले नुसत शब्द नाही तर तो एक अश्रूचा थेंब सांगुन जातो क्षणार्थात पाखरू होऊन कधी फुलां वर बसतो हे विसरायला पडत नात तिखट गोड बनत
रिक्त झालाय मन कि भरून आलाय हे मज काही कळेना माजलाय भावनांचा कल्लोळ हा काही केल्या थांबेना हाक कोना कशी द्यावी हे काही समजेना नात्यांच्या ह्या बाजारात कोण आपल हे मात्र उमजेना
जेव्हा जेव्हा तुझ्या कुशीत येऊन तुझ्या हृदयाचे ठोके ऐकत असते त्यावेळी ते मला जगातले सर्वात सुंदर गीत वाटते मग मी हळूच तुझ्या डोळ्यात बघून ते वाचण्याचा प्रयत्न करते नी कसली जादू त्यातही मला माझेच प्रतिबिंब दिसून जाते आणि नकळत हळूच माझ्या गालांवर लाली चढून मी लाजून जाते याची मात्र तुला जरा ही खबर नसते.....
Comments
Post a Comment