मी , तो आणि समुद्र .....

                                                    सांजवेळ झाली एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता तर दुसरीकडे तिचे डोळे पाणावले होते . मधेमधे विजा कडकडत होत्या नि त्याच्या प्रकाशाने तिचे ते अश्रू मोत्याच्या मणीप्रमाणे चमकू लागली . एका हातात डायरी तर एका हातात पेन , मन भरून आले , डोक्यामध्ये हजारो प्रश्न रेंगाळत होती. बाल्कनीमध्ये बसल्यामुळे पावसाच्या सरी तिला स्पर्श करू बघत होत्या , हवेचे गार झुळूक तिला धक्का मारून आपली वाट काढत होते , क्षणार्थात मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला . नाही म्हणता म्हणता तिचे अश्रू अनावर झालेत आणि ती हळूहळू हुंदके देत ती डायरी वाचू लागली . जुनी डायरी आणि...... तिचे प्रेम याचे combination म्हणजे तिचे लिखाण आणि त्याची शब्द . आवडत नव्हते तिला लिहायला मात्र त्याच्यामुळे ती लिहायला लागली होती .गाणी ,कविता , चारोळी , शायरी हे सगळे त्याच्याकडून ती शिकली होती . भावना व्यक्त करू लागली होती . डायरीचे पाने ती एकापाठोपाठ वाचू लागली......."आज त्याची नि तिची भेट झाली . थोडा आगाऊ पण मनाने चांगला वाटत होता , (त्याच्या स्वप्नात रंगून)  त्याच्या खोडकर स्वभावामुळे कदाचित ती त्याच्याकडे वळली असेल , कारण हीचा स्वभाव तो शांत , कोणाशी हि क्वचित बोलायचं आणि मुख्य म्हणजे कामापूरता बोलायचं . त्या सागरीकिनाऱ्यावर झालेल्या त्या भेटेमुळे तिच्या मनात असंख्य प्रश्नांचे थवे निर्माण झाले , कधी नव्हे ती त्याक्षणी स्वतःचा विचार करू लागली . त्या सागरी लाटेमध्ये स्वतःचे प्रतिबिंब बघून मी कशी दिसते ते न्याहाळू लागली , हळूच गालावरची ती केसांची लट कानाच्या मागे टाकत गालातल्या गालात लाजायला लागली. त्यादिवसापासून तिने स्वतःमध्ये बदल आणला , कोणासा ठाउक हा बदल तिला आवडायला लागला . तिला समजून चुकले आपण प्रेमात पडलोय आणि आता फक्त नि फक्त आनंदात राहायचं असे तिने ठरवले . ऑफिस मध्ये तिला असे बघून सगळे चकित झाले होते , सगळे विचारात पडले " हिला काय झाले म्हणून  ? " , पण ति एकही शब्द न बोलता आपल्या कामात व्यस्त झाली . आता हे तिचे दिनक्रम झाले होते . ऑफिस संपल्यानंतर समुद्राकिनारी जाऊन स्वतःला वेळ द्यायचा ,त्याला बघण्याचा एक क्षण ती सोडायचा नाही .








                         मात्र हिच्या बदलत्या स्वभावाचे त्याला थोडी सुद्धा चाहूल नव्हती , तो आपले आयुष्य जगण्यात एवढा मग्न होता की ती कोण? , कुठली? काहीच कल्पना नव्हती , मात्र एक गोष्ट होती जी ह्या दोघांना बांधून ठेवण्यात यशस्वी व्हायची ती म्हणजे समुद्रसपाटी . हळूहळू ती(सई) त्याच्या नजरेस पडू लागली , त्याचे लक्षवेधून घेण्यात सई ने कुठलीहि कसर सोडली नव्हती , खरं तर सई ला काही करण्याची गरज नव्हती तिचे हास्य आणि गालावरची खळीच त्याला तिच्याकडे खेचून घेण्यासाठी खुप होते. न बोलता , न सवांद साधता ते एकमेकांशी बोलू लागली ,सगळा नजरेचा खेळ , आणि चेहऱ्यावरील हावभाव यांच्या साहाय्याने ते एकमेकांना खुणवू लागले .  नकळत त्याला(निल)ला तिचे कुतूहल वाटायला लागले . सईला समुद्रकिनारी बघून त्यालाही कुठे तरी मनाला समाधान वाटायला लागले . हक्काची नाही मात्र ओळखीच्या नात्याने तो तिला खुणावत होता . न बोलताच एकमेकांच्या मनाची व्यथा त्यांना कळत होत्या . पण दोघांची एकमेकांसोबत बोलण्याची हिम्मत होत नव्हती , प्रेम हे शब्दहीन असू शकते हे त्यावेळी त्यांना समजले . निल हि हळूहळू तिच्या बद्दल विचार करू लागला होता , तिच्याशी बोलावं , वेळ घालवावा , हातात हात घेऊन समुद्रकिनारी फिरावं , तासंतास तिच्या गोष्टी ऐकत बसावे , तिचे हसणे  , तिचे लाजने सगळे अनुभवाव हे त्याला मनोमन वाटत होते . पण एवढे सगळे असून पण तो आपले ते क्षण तिच्यासोबत घालवण्यासाठी मागे पुढे करत होता .



                    त्यादिवशी सई च्या मनाची घालमेल अंतरा ला बघवत नव्हती , अंतरा - काय ग! काय झाले , काय होतंय एवढी का अस्वस्थ तू , आणि मागील काही दिवस बघतेय मी किती बदलीस तू ? तुला असे कधी बघितले नव्हते मी . काय चालय सांगशील का तू मला ? 
सई - (थोडी हसत) अग हो हो .......एकाच श्वासात किती ते प्रश्न , सांगते सांगते सगळं काही सांगते पण.....
अंतरा - आता पण काय ?
सई - (सांगायला सुरुवात करते)तुला आठवते , मागच्या महिन्यात मी नेहमी प्रमाणे समुद्रकिनारी गेले होते . 
अंतरा - हा त्याचे काय ?
सई- तेव्हा एक मुलगा माझ्या नजरेस आला . (मग्न होऊन) त्याला बघताक्षणी आयुष्य कसे जगावे याचे धडे शिकले मी .... आणि नकळत मी त्याच्यवर प्रेम करायला लागले , गेल्या 45 दिवसांपासून आमची रोज भेट होते मात्र बोलणं होत नाही किंवा आम्ही तसा प्रयत्न हि केला नाही .  आता ना.... मला राहवत नाहीये अग , म्हणजे ना त्याला सांगायचं मला की... माझं प्रेम आहे वैगेरे पण त्याला बघाताक्षणी शब्दहीन होऊन जाते ,कसले भान राहत नाही आणि वाचा हि फुटत नाही (अंतरा तिच्या कडे एकटक बघून तिचे बोलणे ऐकत होती ) ये काय ग ! काय झाले तू काही का बोलत नाहीये ?
अंतरा - सई तुला कधीच असे नव्हते बघितले मी , शांत ,कामापूरते बोलणारी सई आज चक्क प्रेमाची भाषा बोलू लागलीस .मला आवडेल त्याला भेटायला . (आनंदात)
सई- खरच ? चल आज तुला दाखवते मी कोण  तो.
अंतरा- थांब ....त्याचे नाव काय ?
सई- नाही माहिती 😬😬 
अंतरा - वेडी ...प्रेम करतेस ना मग साधं नाव पण नाही माहिती तुला (थोडी चिडून)
सई- ते सोड ..चल तू आधी नाहीतर निघून जायचा तो .(दोघी पळत किनाऱ्याची वाट पकडतात) 
त्या २०मिनिटं च्या प्रवासामध्ये सई ने आपले भविष्य , आणि वर्तमान काळ रंगून झाला होता. सई आतुरली होती त्याला भेटायला , सगळं काही सांगायला . 
अवघ्या 20 मिनिटात तिने स्वतःचे आयुष्य जगुन घेतले होते .



क्रमक्ष :

Comments

  1. I'am eagerly waiting for the complete story but till now I have read the story is nice I can say "thodi filmy Hain " but acchi Hain

    ReplyDelete
  2. You really know how to keep readers entangled in your story.

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिले आहे वाचताना वाचतच राहवे असे वाटते पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी आतुर आहोत लवकरच पुढची पोस्ट टाकावी ही विनंती

    ReplyDelete
  4. Felt like I lived the story, it made me cry a little

    ReplyDelete
  5. अप्रतिम amazing सुन्दर वर्णन स्तब्ध झालो काही क्षण
    उत्स्तकता दूसरया भागाचि part 2💖💖

    ReplyDelete
  6. Live बघावेसे वाटतेय यार😍

    ReplyDelete
  7. विवेचन खुप दर्जेदार केलं आहे आणि प्रचंड उत्सुकता आहे पुढे काय झालं असेल हे जाणून घ्यायची पुढचा भाग लवकरच पोस्ट करावा विनंती.....

    ReplyDelete
  8. A love story that engages the reader. Don't stop writing, just keep writing beautiful stories

    ReplyDelete
  9. सगळ्या वाचक रसिकांचे मनापासून आभार .........

    ReplyDelete
  10. लवकरच पुढील भाग वाचण्यास मिळेल ☺️☺️.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3