Posts

Showing posts from June, 2015

गार वारा .......

तो एक गार वारा जो हळूच गालांवर आलेल्या  केसाला स्पर्श करु  जातो तो एक गार वारा  जो तुला बाघता  क्षणी  मनामधे सागरी लाटा  उथळुन जातो  तो एक गार वारा   जो नभला साथ देणारे  पाखरू आपल्या प्रेमाची  कबूली देणुन जातो   तो एक गार वारा भर पावसात नाचून दमलेला मोर आपला आनंद अश्रुद्वारे व्यक्त करुण जातो 

साथ मैत्रीची .........

मैत्री असावी समुद्राप्रमाणे निखळ मायेने भरलेले मैत्री असावी आपल्या डोळांप्रमाणे दुःखात असो वा सुखात अश्रु मात्र अमृतासारखे निघणारे मैत्री असावी नदी प्रमाणे माहिती असते प्रवास करून शेवटी समुद्राला भिडणारी  मैत्री असावी गुलाब -काट्याप्रमाणे गुलाब तोड़ताना काट्याची जाणीव करून देणारी मैत्री हवी झाड्याच्या पालवी प्रमाणे स्वत: झडून दुसऱ्याना ताट मानेने उभी करणारी