Posts

Showing posts from 2018

कॉलेज ची डायरी

आता मात्र कॉलेजच्या डायरी मध्ये रोजचे किस्से लिहिणे कमी होणार रोजचा आमचा कँटिंग चा टेबल आता रिकामा दिसत जाणार तू असे केले होते , तू तसे केले होते हा गोड वादविवाद आता नाहीसा होणार शेवटच्या घटकेला असाइनमेंटची देवाण घेवाण करणे आता थांबवल्या जाणार लायब्ररीत रात्रं दिवस घालवून अभ्यास कमी नि झोप जास्त हे कुठे तरी हरवल्यागत होणार पेपर संपल्या नंतर होणारा आनंद नि एकदुसऱ्यां मध्ये होणारे अंतर हे चित्र दिसणे बंद होणार एकाच डब्यात जेवण करताना शेवटचा घास कोणाला मिळणार याचे तर्क वितर्क थांबणार भर पावसात एकाच छत्रीत सगळे येऊन अर्धवट भिजणे हे आता इतिहासात जमा होणार  

एकतर्फी प्रेम....

तुझी सवय होऊ नये म्हणून सतत तुला टाळत असते .... कारण प्रेम  माझे एकतर्फी म्हणून तुझ्याकडे ओढल्या जाते ..... तुला चोर नजरेने बघून तुझाच चेहरा वाचण्याचा माझा प्रयत्न चालू असते...... ओठांवर हसू तुझ्या आणि मी मात्र गालातल्या गालात लाजून जाते ....... तुझं पण मन माझ्यासाठी झुरत का ? हा एकच प्रश्न सतावत राहतो ...... नि डोळ्यांचा परदा अलगद उघडून "वेडे एकतर्फी प्रेम ना तुझे "हे सांगून जातो ...... दिसताच तू अबोल झाल्यासारखे वाटते  .... जाताच तू काही हरवले असे जाणून येते .... रोज तुझ्या वळणावर डोळे टिपून बसले असते.... आज तुला उमजणार माझे प्रेम हि आशा उराशी जपत असते .....

नेमकं प्रेम कि मैत्री ...

नेमकं प्रेम कि मैत्री या प्रश्नावर येऊन थांबते गुंतलेले  हे मन काही केल्या माघार घेत नव्हते दचकून पाय अडखळावे  तसे माझ्या या विचाराचे व्हायचे चौफेर पसरलेल्या त्या तिमारामधून अलगद आशेची छवी दिसल्यागत व्हायचे आज ओंजळीमधील फुले रोजच्या पेक्षा जास्त सुगंध पसरवू लागली नाही म्हणता म्हणता मी तुझ्यात हळुवार पणे गुंतत चालली  शोधू लागली नवी नवी कारणे रोज तुझ्याशी बोलण्यासाठी रमून जाते तासंतास आजकाल तू न केलेल्या गप्पांमधी न चुकता ,न विसरता, हल्ली मी तुझ्याच बद्दल बडबडत राहते प्रत्येक्षात काय तर स्वप्नात सुद्धा तुझ्याच प्रेमाचे गुणगान गात राहते

हुंदके...

हल्ली काही लिहावसे वाटत नाहि रे कारण तुझ्या त्या आठवणी हुंदके देत बाहेर पडतात अश्रु ही कोरडे पडून फ़क़त त्यांची निशानी ठेऊन जातात तू येशील  माझे अश्रु अलगद पूसशील या आशेने पापण्या बंद होतात हसुन जी खळी गालावर यायची आज ती तू नसण्याने नाहीशी होत जातात खरच हल्ली काही लिहावसे वाटत नाहि रे......... .

वहीचे पान ....

जश्या जश्या मनात साठत जातात आठवणी तुझ्या तसे तसे पाने भरत  जातात वहीच्या माझ्या शब्द ओठांवरची अलगद सुरेख अक्षरात रेखाटली जातात बघता बघता एकामागे  एक पाने भरू लागतात हळूच भरलेल्या पानांची रंग बदलत जातात तसेच नवीन जुन्या आठवणी जाग्या होतात तुझ्याबद्दल लिहायला शब्द अपुरे नाही रे पडत पण काही भावनांना कागदावर नाही ना उतरवता येत काही काळात वही तर भरून जाते मात्र भावनांचा गंध ओलसरच राहते

बघ तुझे हे असे आहे ...

बघ तुझे हे असे आहे प्रेम करतोस ते हि न सांगता रागवतोस ते काही चूक नसताना हसवतोस जेव्हा नाराज असताना बघ तुझे हे असे आहे कधी कधी कळत नाही मला आपल्यात प्रेम आहे कि अजून काही वागतोस कधी घट्ट असलेल्या मैत्री सारखा तर कधी वाटे आयुष्याची संगिनी आहे मी तुझी बघ तुझे हे असे आहे अलगद डोळ्यावरील अश्रू पुसुन आपलंस करतोस तर कधी रागात बोलून दूर साऱतोस कधी प्रेमाचा वर्षाव करून प्रेम व्यक्त करतोस तर कधी गर्दीत अनोळखी होऊन जातोस बघ तुझे हे असे आहे ...... 

इतिहास माझ्या राजधानी रायगडाचा ...

स्वर्गासारखा सुंदर नाही पण थाट त्याहून अधिक माझ्या सह्याद्रीचा ह्याच सह्याद्रीच्या पोटात वसे इतिहास माझ्या राजधानी रायगडाचा चोहूबाजूस  नांदती अनेक डोंगरे खेळती खांद्यावरी पाऊस  नि उन्ह कोवळी नको व्हावा त्रास जिजाउ मातेस म्हणुनी बांधिला वाडा पाचाडजवळी गाजवती आपले अस्तित्व महादरवाजा दिसते दोन कमळाकृती शोभुनी हळूच पडती दूरवर दृष्टी उभा लिंगाणा , राजगड येती दिसुनी मोठा इतिहास माझ्या या  गडाचा कौतुकाने सांगे कथा गवळणी हिरकणीची वाटे कुतूहल मज रचताना काव्यरूपी सौदर्य ह्या माझ्या सह्याद्री रांगांची  

अरे देवा....

आज परत पाऊस पडणार नि आपण भिजणार नकळत हातात हात येऊन   सरींचा आपल्यावर वर्षाव होणार  त्यात ढगांच्या गडगडाट मुळे हात घट्ट होणार  चमकणाऱ्या त्या विजा मधेमधे focus टाकणार  मी हळूच सरी हातात घेऊन तुझ्याकडे फेकणार  तुझा लाल झालेला चेहरा मला थोडं घाबरवणार  मग तू गालातल्या हसून मला रागावणार अरे देवा  . . . . . . . . . . मग परत मी तुझ्या प्रेमात पडणार सावकाश पणे पाऊस कमी होऊ ते सोनेरी उन्ह मधेच डोकवणार सूर्याच्या त्या किरणांनी आपलं प्रेम सात रंगात रेखाटले जाणार पावसाची आणि उन्हाची या मस्तीमध्ये प्रेम आपले नव्याने फुलणार .... . . . .

वेडे हे मन...

किती रे वेडे हे मन माझे  कळलेच नाही कधी झाले तुझे  असा कसा उमटून गेलाय मनात ठसा  हल्ली त्या प्रेमाचा होतोय आभास असा  दिसत ते त्या पावसाच्या सरीमध्ये  जाणवतो त्या गार हवेच्या स्पर्शामध्ये  शोभतो त्या झाडाच्या पानांवरच्या थेंबामध्ये  मिसळून जातो त्या मातीच्या सुवासामध्ये  कोणास ठाऊक ऐवढे कसे वेडे हे मन  तुझेच गाऊ लागले वेळोवेळी गुणगान  

रडतेय रे मन ....

रडतेय रे मन माझे तुझ्या या अबोला मुळे सतत घुसमुट होतीये तू नसल्यामुळे मान्य आहे चूक माझी मला सतत तुला देतीये त्रास गमावून नाही ना बसेल तुला याचाच  होतोय भास नको ना वाढवूस अंतर आपल्या मधले नको ना ती  शांतता आपल्यात हजारो प्रश्न रेंगाळतेय माझ्या या मनाच्या भोवती इथवर च होती का साथ तुझ्या माझ्या नात्याची सावरता सावरेना हे मन माझे विसरता विसरेना हे प्रेम तुझे खरच रडतेय रे मन माझे तुझ्या या अबोला मुळे सतत घुसमुट होतीये तू नसल्यामुळे

सप्तरंगी हे प्रेम...

खूप काही सांगायचे आहे या मनातल्या गोष्टी आतुरलेत ओठांवरील शब्द तुझंपाशी पोहचवण्यासाठी अंतरंगी रंगलेले हे प्रेम पाहतेय वाट तुझ्या जवळ व्यक्त होण्यासाठी क्षणोक्षणी मागतेय तुझी साथ आयुष्य एकत्र घालवण्यासाठी हवाय तुझा हात माझ्या हातात ती पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी करू एक नवीन सुरुवात या सप्तरंगी तारेच्या साक्षीने मिळून बनवलेलं हे छोटंसं घरटे बहरेल आपल्या प्रेमाच्या गोष्टीने भिजलेल्या या डोळ्यांच्या पापण्या मान्य करेल तुझं माझं प्रेम ........  

साखळी.....

नकळत आपल्यात एक नाते झाले अतूट अशी सुंदर मैत्री झाली कधी वादाने तिखट तर कधी प्रेमाने गोड होऊ लागली त्यात तुझा तो न झालेल्या सवांदामुळे रुसवा तर कधी समजुतीने माझी बाजू घेऊन घालवायची माझ्यातला रुसवा हळू हळू सांगू लागले गोष्टी माझ्या मनातल्या तुला त्यावर दिसू लागले साखळी आपल्यातल्या बंधनाची दिवसा मागे दिवस उलटले तसेच मैत्रीला आपल्या दिशा उमजू लागली अशीच राहावी तुझी नि माझी मैत्रीची जोडी देवा कडे अशी प्रार्थना केली आयुष्याच्या वळणावर मिळतील खूप मित्र तुला पण मला विसरणार नाही याची खात्री आहे मला ...... 

मोबाईल ची स्क्रीन......

हल्ली फक्त मोबाईल ची स्क्रीन स्क्रोल होते तुझ्या msg ची वाट बघत झोपी जाते आता येईल तुझा msg नि काढशील माझी समजूत सतत मनाला वाटत गेले तू online असून पण नसलेला तुझा msg काळजाला भिडून जाऊ लागले विचार येतो तो एकच खरंच आपल्यात नव्हते ते प्रेम , नव्हत्या  त्या भावना , नव्हती ती मैत्री घालवलेले ते क्षण नाही का आठवत तुला झालेली ती वाद नाही का लक्षात तुझ्या हळूच माझी मस्करी करत माझा राग घालवणे कसे नाही रे जमले तुला थोडं रागावून ,थोडे प्रेमाने का नाही थांबवुन घेतले मला मी हात सोडला तर का नाही घट्ट करून ठेवलास मी पाठ फिरवल्यावर का तू पण फिरवलीस कायमची ........ हाच विचारत करत मोबाईल ची स्क्रीन स्क्रोल होत होती ......... 

कवी......

कवी हा फक्त कवी नसतो त्याला हि emotion ची भावना असते सतत लिहीत असतो दुसऱ्यांसाठी विचार करून शब्द मांडत असतो तो तुमच्यासाठी ना रात्र बघतो ना दिवस काय आवडेल तुम्हाला याचा करतो विचार खास जगत असतो तो त्या ओळींमधे करत असतो जुळवा जुळवी शब्दांची कवितेमधे कधी लिहितो स्वतःची कहाणी तर कधी मांडतो जुन्या आठवणी कवी हा फक्त कवी नसतो त्याला हि emotion ची भावना असते

कोड...

कालांतराने तुझं नि माझं नातं बदलेल कधी च वाटले नव्हते या मनाला माझ्या आयुष्याचा एक मोल्यवान भाग होशील ठाऊक नव्हते मला झालेली ती पहिली भेट नि नकळत झालेला तो संवाद वादामुळे आज हि आठवतात त्या तक्रारी व्हायच्या छोट्या मोट्या गोष्टींमुळे सतत चालू राहायची टाळाटाळी एकमेकांच्या समोर येण्याची कधी तुला बघून लाजायला लागले भान मला याचे राहिले नाही डोळे कधी तुला शोधायला लागले नि स्वप्नात  तू जागा घेतलीस हे कोड मात्र मला सुटले नाही वाटली थोडी भीती लपवलेल्या प्रेमाची कधी कळेल तुला रेशमी बंध तुझ्या माझ्या नात्याची भरलेल्या मैफिली मध्ये आवाज देताच थोडी बावरलेली पण आनंदा ने तुझ्या कडे  फक्त बघू लागली

शब्द ...

ती खूप लाडाने  कधी कधी शब्द सापडत  नाही रे बोलताना तुझ्याशी  फक्त डोळ्यात बघत राहावेसे वाटते  तो .... हे ऐकून  अग , शब्द तर ओठांवर  चे सांगायला असतात  मनाचे सांगायला तुझी  एक नजर भरपूर आहे  ती....थोडी लाजून  होय रे , नजर ला नजर भिडली  म्हणून जगाला ओरडून सांगते  माझं तुझ्या वर प्रेम आहे ते  तो... अंग , ओरडून कश्याला सांगायला हवं  तुझी गोड स्मित हास्य सगळं काही सांगून जाते