सप्तरंगी हे प्रेम...

खूप काही सांगायचे आहे
या मनातल्या गोष्टी
आतुरलेत ओठांवरील शब्द
तुझंपाशी पोहचवण्यासाठी
अंतरंगी रंगलेले हे प्रेम पाहतेय वाट
तुझ्या जवळ व्यक्त होण्यासाठी
क्षणोक्षणी मागतेय तुझी साथ
आयुष्य एकत्र घालवण्यासाठी
हवाय तुझा हात माझ्या हातात ती
पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी
करू एक नवीन सुरुवात
या सप्तरंगी तारेच्या साक्षीने
मिळून बनवलेलं हे छोटंसं घरटे
बहरेल आपल्या प्रेमाच्या गोष्टीने
भिजलेल्या या डोळ्यांच्या पापण्या
मान्य करेल तुझं माझं प्रेम ........  

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3