Posts

Showing posts from October, 2018

वहीचे पान ....

जश्या जश्या मनात साठत जातात आठवणी तुझ्या तसे तसे पाने भरत  जातात वहीच्या माझ्या शब्द ओठांवरची अलगद सुरेख अक्षरात रेखाटली जातात बघता बघता एकामागे  एक पाने भरू लागतात हळूच भरलेल्या पानांची रंग बदलत जातात तसेच नवीन जुन्या आठवणी जाग्या होतात तुझ्याबद्दल लिहायला शब्द अपुरे नाही रे पडत पण काही भावनांना कागदावर नाही ना उतरवता येत काही काळात वही तर भरून जाते मात्र भावनांचा गंध ओलसरच राहते

बघ तुझे हे असे आहे ...

बघ तुझे हे असे आहे प्रेम करतोस ते हि न सांगता रागवतोस ते काही चूक नसताना हसवतोस जेव्हा नाराज असताना बघ तुझे हे असे आहे कधी कधी कळत नाही मला आपल्यात प्रेम आहे कि अजून काही वागतोस कधी घट्ट असलेल्या मैत्री सारखा तर कधी वाटे आयुष्याची संगिनी आहे मी तुझी बघ तुझे हे असे आहे अलगद डोळ्यावरील अश्रू पुसुन आपलंस करतोस तर कधी रागात बोलून दूर साऱतोस कधी प्रेमाचा वर्षाव करून प्रेम व्यक्त करतोस तर कधी गर्दीत अनोळखी होऊन जातोस बघ तुझे हे असे आहे ...... 

इतिहास माझ्या राजधानी रायगडाचा ...

स्वर्गासारखा सुंदर नाही पण थाट त्याहून अधिक माझ्या सह्याद्रीचा ह्याच सह्याद्रीच्या पोटात वसे इतिहास माझ्या राजधानी रायगडाचा चोहूबाजूस  नांदती अनेक डोंगरे खेळती खांद्यावरी पाऊस  नि उन्ह कोवळी नको व्हावा त्रास जिजाउ मातेस म्हणुनी बांधिला वाडा पाचाडजवळी गाजवती आपले अस्तित्व महादरवाजा दिसते दोन कमळाकृती शोभुनी हळूच पडती दूरवर दृष्टी उभा लिंगाणा , राजगड येती दिसुनी मोठा इतिहास माझ्या या  गडाचा कौतुकाने सांगे कथा गवळणी हिरकणीची वाटे कुतूहल मज रचताना काव्यरूपी सौदर्य ह्या माझ्या सह्याद्री रांगांची