मैत्रीचे प्रेम...

मैत्रीचे प्रेम हे कधी पलीकडे गेले

याचे भान हि मला राहिले नव्हते 

मात्र मला हे कधीच पटवून देता आले नाही 

कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही


अश्रू तुझ्या डोळ्यात असायचे 

मात्र मन माझे हळवे व्हायचे 

झालेला हळवेपणा मला कधी दाखवताच आले नाही

कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही 


कित्येक आठवणी साठवून ठेवल्या , 

प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या

मात्र त्या कधी तुझ्या समोर मांडता आले नाही 

कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही


बघताच तुला मन फुलून यायचं , सगळी कडे 

आपला सुवास पसरून बेभान करायचं 

त्या फुलांचा सुगंध तुला देताच आले नाही 

कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही 


नकळत तुझ्याशी तासंतास बोलायची , 

दाटलेल्या भावनांशी झुंज माझी चालायची 

ओठांवरचे शब्द तुझ्या कानापर्यंत पोहचवता आले नाही 

कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही 


होताच तुझा स्पर्श मला , थोडी लाजून जायची मी

शहारलेल्या हात मग अलगद तुझ्या कडे सरकवयाची

बिनधास्त तुझ्या मिठीत यायला मला कधी जमले नाही 

कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही


Comments

  1. खूप सुंदर बोलण्यातील अबोला आणि अव्यक्त झालेले प्रेम खूप सुंदर रित्या मांडले आहे छान

    ReplyDelete
  2. khup sunder kavita bola aasech kavita karat raha. me blog lihito sir jar tumhala blogger madhe kahi help havi aasel tar tumhi majhya blog la visit dya blogandtricks

    ReplyDelete
  3. खूपचं छान ,भावना छान शब्दांत व्यक्त केल्या आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कैद...

सासर ...