Posts

Showing posts from March, 2020

ओळख......

वाटले लिहावे आज फक्त तुझ्यासाठी मांडावी प्रेम कहाणी तुझ्या-माझ्यातली..... नव्याने झाली होती आपली ती ओळख नकळत रचल्या गेली कहाणी आपल्या प्रेमाची ....

अव्यक्त झालेले प्रेम ....शेवटचा भाग

Image
                           पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार असे वातावरण झाले होते . या सोनेरी पावसात ह्या दोघांचे प्रेम जोमाने फुलत होते . पण कुठे तरी कमीपणा होता कारण यांच्या आयुष्यात आलेली त्याची ती , त्यामुळे दोघे हि थोडे मागेपुढे करत होते . एकीकडे पावसाने अख्ख्या परिसरावर राज्य गाजवले होते नि दुसरीकडे  यांच्या प्रेमाला नव्याने पालवी फुटू लागली होती  . बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आज कदाचित मला उशीर होईल , असे मनात फुटफूट तो कॉलेजची तयारी करू लागला . तो -  आज तिला सगळे काही सांगून मोकळा होतो , कारण माझं आयुष्य आता तिच्या बरोबर मला काढायचे आहे , पण ..... पण गार्गी चे काय ? (गार्गी हि त्याची ex gf ) हळूच श्वास रोखुन , पण मी का तिचा विचार करून ना , ती मला सॊडून गेली होती मी नाही . आज ती परत आली तर मी का माझं खरं प्रेम सोडू , आणि गार्गी वर माझं खर प्रेम असत तर स्वराचा नि माझा काहीच संबंध नसता. हे देवा ....!  डोक्याचा भुगा होण्याची वेळ आलीये आता माझ्यावर . असाच विचार करत करत त्याने आपली बाईक काढली आणि कॉलेजसाठी निघाला . मुसळधार पाऊस  कोसळत असल्यामुळे कॉलेजच्या गेट वर कोणा

अव्यक्त झालेले प्रेम .....भाग 2

Image
                                   आज कदाचित माझी नि तिची भेट व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना तो करू लागला , डोळ्यात नवी स्वप्न आणि मनात नवी आशा घेऊन तो कॉलेजसाठी तयार झाला . आज ती कॉलेजला येईल नि माझं तिच्याशी बोलणे  होईल असे त्याला मनोमंन वाटू लागले . रोज उशीरा येणारा तो आज अर्धा तास आधीच येऊन पोहचला . आज तो खुश आणि प्रसन्न दिसत होता , अचानक त्याला ती दिसली,  आज खुप गोड नि सुंदर दिसत होती ती , लाल ड्रेस , केस खुले सोडुन , चेहऱ्यावर स्मित हास्य , ओठांवर लाल लिपस्टिक , हिलची सॅन्डल , आणि मधून मधून पडणाऱ्या सुर्याच्या किरणाने अजुन तिचे रूप खुलवून गेले होते , "तेरी  याद  में  तबियत  "मचल"  जाती  है...!! वक़्त-ए-शाम की सूरत "बदल"  जाती है...!! जब तीर ख्यालों का "चुभता" है जिगर में...!! तो  मेरे सब्र  की नीयत  "पिघल" जाती है..."                                           त्याच क्षणी त्याला वाटले जावं नि आपल्या गुडघ्यांवर बसुन तिला विचारावं ,  याने लगेच आपले केस ,शर्ट नीट करत थोडा सावध होत धीर दिला , ती गेट वर येऊन कोणाची तरी वाट

काय असत प्रेम ........

काय असत प्रेम ? नकळत कोणाला तरी आपले हृदय देऊन स्वतःला विसरणे  । चेहऱ्यावरील हावभाव लपवत स्वतःचे एक जग तयार करणे ।। म्हणजे प्रेम होय........ काय असत प्रेम? त्याला भेटण्यासाठी ची उत्कटता त्याला न सांगता अनुभावावी लागणे । त्याच्याच विचारात हळू हळू रात्री मात्र एका कड्यावरून दुसरी बदलणे  ।। म्हणजे प्रेम होय....... काय असत प्रेम ? कदाचित तो नसेल करत प्रेम माझ्यावर ह्या भावनांशी झुंज करणे  । होकार की नकार असेल ह्याच विचारांची डोक्यात गुंतागुंत होणे  ।। म्हणजे प्रेम होय........ काय असत प्रेम ? भूतकाळाशी नातं न ठेवता वर्तमान घालवण्यासाठी झालेली ती तळमळ । भाविष्यकाळा साठी स्वतःवर क्षणर्थात पाडलेली ती भुरळ ।। म्हणजे प्रेम होय .........

कारण...

पापण्या ओलसर होऊन हळूच डोळ्यातील अश्रु गालांवर पडली मनातुन खुप हळवी झालेली ती आज कारण नसताना रडू लागली

माझा बाबा ......

पहिले पाऊल टाकताना धडपडलेली ती मी त्याच वेळी चुकलेला त्यांच्या काळजाचा ठोका यांच्यातले नाते आज कळाले मला सायकलसाठी केलेला हट्टहास आठवतो मला पण स्पष्ट नकार देणारे माझे क्रुर बाबा आठवते मला सायकल न देण्यामागचे कारण आज उमजले मला निश्चय केला होता मनात ,नाही करणार हट्ट परत मात्र दुसरीकडे माझ्या छकुली चे प्रत्येक हट्ट पूर्ण करणारा ,खंबीर क्रुर बाबा आज समजला मला लहानाचे मोठे होत गेले मी नि ते तरुणाचे वृद्ध मी माझ्यात विश्वात मग्न होत गेले मात्र माझे क्रूर बाबा कधी अस्पष्ट झाला कळलंच नाही मला पॉकिटमनी  साठी वाद घालून रागात निघून जाणारी मी आणि माझ्याच लग्नात पैश्यांची  जमवा जमवी करणारा माझा क्रुर बाबा आज माप ओलांडताना कळाला मला

कबुली ......

रचवू कि नाही ओळ माझ्या कवितेच्या तुझ्यासाठी हा मोठा प्रश्न पडला त्यात पण देऊ कि नको कबुली तुझ्या माझ्या प्रेमाची सतत हा विचार डोक्यात रेंगाळू लागला

व्याकुळ मन ....

मनातले तुला सांगायला कधी जमलेच नाही मला              व्याकुळ झालेली मी कधी               सापडलेच नाही स्वतःला हुरहुरणाऱ्या  भावनांना कधी एकरूप होता नाही आले               तरी का कोणास ठाऊक               तुझ्या प्रेमात कसे बुडाले  

अव्यक्त झालेले प्रेम .....भाग १

Image
                                              तो आतून खचलेला कारण पहिल्या प्रेमापासून मिळालेला  विश्वासघात  त्याला कदाचित पचवता आला नसावा म्हणून , हिरमुसलेला त्याचा चेहरा पाहताच क्षणी वाटणारी त्याची काळजी कुठे तरी तिच्या मनात जाऊन बसले होते . आज बोलावे उद्या बोलावे त्याच्याशी म्हणून ती धडपडत होती . ती मात्र एकदम बिनधास्त , मनात येईल तसे वागायचे . वाटेल तेव्हा कधी कोणाशी हि  मस्ती करायची  असा तिचा स्वभाव . मित्र मैत्रिणी नि घेरलेली  . अगदी आनंदात नि कुठल हि टेन्शन न घेणारी अशी ती . चुकून तो तिच्या नजरेस पडला . जरा विचित्र पण गोड असा तो ,त्याचे मात्र तिच्या कडे लक्ष नव्हते . कारण तो " दर्द भरे मैफिल को हि अपनी जिंदगी मानने लगा था।  "            हि मात्र रोज त्याला नोटीस करू लागली , आज कदाचित त्या वेड्याचे  लक्ष तिच्याकडे जाईल नि हि त्याला आपली गोड नि स्मित हास्यानी त्याच्याशी मैत्री करेल, असे तिला वाटत होते  .एकीकडे तो त्याच्या दुःखात आपले दिवस मोजत होता नि दुसरी कडे मात्र हिच्या मनात त्याचा विचार चालू होता  . का बरं हा असा आहे ? मेल्या थोडं बघत पण नाही माझ्या कड

प्रेम.....

वाहत्या नदी सारखे होते प्रेम तुझे मी मात्र अथांग अर्णवा प्रमाणे केले होते तू कधी प्रयन्तच नाही केले आपले किनारे जोडण्याचा मी मात्र आपल्यात सात जन्माचा पुल बांधण्यात मग्न होते  .....