अव्यक्त झालेले प्रेम .....भाग 2

                                   आज कदाचित माझी नि तिची भेट व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना तो करू लागला , डोळ्यात नवी स्वप्न आणि मनात नवी आशा घेऊन तो कॉलेजसाठी तयार झाला . आज ती कॉलेजला येईल नि माझं तिच्याशी बोलणे  होईल असे त्याला मनोमंन वाटू लागले . रोज उशीरा येणारा तो आज अर्धा तास आधीच येऊन पोहचला . आज तो खुश आणि प्रसन्न दिसत होता , अचानक त्याला ती दिसली,  आज खुप गोड नि सुंदर दिसत होती ती , लाल ड्रेस , केस खुले सोडुन , चेहऱ्यावर स्मित हास्य , ओठांवर लाल लिपस्टिक , हिलची सॅन्डल , आणि मधून मधून पडणाऱ्या सुर्याच्या किरणाने अजुन तिचे रूप खुलवून गेले होते ,

"तेरी  याद  में  तबियत  "मचल"  जाती  है...!!
वक़्त-ए-शाम की सूरत "बदल"  जाती है...!!
जब तीर ख्यालों का "चुभता" है जिगर में...!!
तो  मेरे सब्र  की नीयत  "पिघल" जाती है..."
                                          त्याच क्षणी त्याला वाटले जावं नि आपल्या गुडघ्यांवर बसुन तिला विचारावं ,  याने लगेच आपले केस ,शर्ट नीट करत थोडा सावध होत धीर दिला , ती गेट वर येऊन कोणाची तरी वाट बघत होती , तो मनात पुटपुटला "तर आलीस हा आज तु ,  मला वेड लावून स्वतःच कुठे ग गायब झालीस ? , आज भेटलीस ना !!आता बस , नाही पळणार मी माझ्या स्वतः पासून आणि तुझ्या पासून पण . आहे ते मनात आज तुला सांगून देणार आहे "  हळूच तो स्वतःला सांभाळत । अरे ओ !  काय हे काय झाले तुला,  गप बस की , किती घाई झाली तुला? आधी तिला येऊ तर दे नि आज ती नक्की स्वतःहून तुझ्याशी बोलेल बघ  . कधी न हसणारा तो आज चक्क हसतोय . नकळत तिचे त्याच्याकडे लक्ष गेले , तो हसतोय हे पाहून तिला थोडं आश्चर्य वाटले नि आनंद पण झाला . ती हळूहळू गेटमधून कॅम्पसमध्ये येऊ लागली आणि दोघांचे हृदय जोरात धडकु  लागले . गार-वारा दोघांना स्पर्श करून त्यांच्या त्यांच्या भावना व्यक्त करत होता , डोळ्याला डोळे भिडत , तर कधी क्षणर्थात लाजून डोळ्यांची पापणी अलगद झुकायची . मधेच चालु असणाऱ्या उन्ह-सावलीचा तो खेळ त्यात अजुनच तिचे सौदर्य न्हाऊन निघत होते ,  कदाचित याच दिवसाची ते दोघे वाट बघत होते . जसे जसे हे दोघे जवळ येऊ लागले तसे तसे स्वतःला सांभाळत होते . दोघे एकमेकांसमोर यायलाच लागेल तेवढ्यात त्याच्या मागून एक आवाज आला, सॉरी !!!!!!
ती (२)  - चुकले रे माझे । तुला माहिती  आहे?  जेव्हा तुझ्यापासून लांब झाले ,तेव्हा मला तुझं खर प्रेम कळाले , खरच खूप मोठी चूक झाली माझी .
तो - अग ! काय हे , तु  इथे कशी काय ? तुला कसे माहिती मी इथे आहे ?

                                      ती मात्र निशब्ध पणे शांत उभी होती , डोळ्यात खुप प्रश्न उभी झाली . हीच का ती जिच्यासाठी हा देवदास झालेला , ठीक आहे ना मग ही का परत आली आता , पण मला का याचा फरक पडत आहे , आमच्यात कुठे प्रेम नि मैत्री होते , अरे मैत्री प्रेम तर दुरच आमच्यात साधा सवांद तरी कुठे होता . असो मला काय ! मला नाही त्रास होणार याचा , ति तिच्या मैत्रिणीला हात देत ,तिथून निघून गेली. ह्या दोघात  मात्र अजुन सवांद सुरूच होता . ती विनवणी करत होती , माफी मागत होती , हा मात्र तिच्याकडे बघत होता , तीला जाताना बघु तो अस्वस्थ झाला , त्याला स्वतःचा राग येत होता . ती मात्र मला काही हि फरक पडला नाही असे दाखवून देत होती . त्रास दोघाला पण होत होता, पर "वो लव्ह स्टोरी भी क्या जीसमें गम और दिल तुटने का दर ना हो"  त्याच्या आयुष्यात असणारी त्याची पहिली gf येताच सगळे काही बिनसले होते . आजचा हा दिवस कसाबसा मावळला , एकाच क्षणात खुप काही घडून गेले होते . त्या रात्री दोघेपण त्रासून गेले होते काय करावे नि काय नाही याचा विचार ते करू लागले . तिने नेहमी प्रमाणे आपली डायरी लिहायला घेतली . न भेटता तिने 100 पाने त्याच्या बद्दल लिहून काढली होती .ती फाडून टाकावे कि तसेच राहू द्यावे म्हणून ती विचार करत होती, कारण त्याची आठवणी  तीला हुंदके देत होती .
""हरवले मन माझे तुझ्या या प्रेमात 
   बेभान झाले तुझ्या सहवासात 
  किती समजावू माझ्या या दिलाला 
  ना ऐकानसे झाले माझे च मला 
 रोज तुझे स्वप्न उराशी जपत जाते 
 पापण्या पण त्या बद्दल बोलून जात होते
 लागले हे मन माझे आज बावळू
माझेच मला कळेना कसे याला सावरू"" ...... हि ओळ लिहीत तिने डायरी बंद केली



                                 होईल का माझे नि तिचे काही ? बोलू का तिच्याशी ? ती कॉलेज ला नव्हती तेव्हा ह्याने तिची सगळी माहिती काढली होती , म्हणून तो त्या रात्री तिच्या घराकडे चक्कर मारायला आला . ती आपल्या बाल्कनी मध्ये बसून होती , तो तिला दिसताच ती लपून बसली
ती - हा काय करतोय इकडे ,  नि का आलाय हा ?
अरे देवा!! काय हे?  वेड-बीड लागले की काय याला.
जाऊ का मी खाली बोलू का त्याच्याशी , पण बोलू तरी काय , नि का म्हणून मी खाली जाऊ , कुठल्या नात्यांनी , बापरे बाप !
ती त्याला बघतेय हे त्याला ठाऊक होते तो हसत होता . .
तो - वेंधली लपायचे होते तर नीट तर लपायचे ना , वेडी
त्याने मनाशी पक्क केले होते माझ्या आयुष्यात मला आता ही वेंधलीच हवी आहे  आणि तो तिथून निघून गेला . हिचे मात्र " हृदयाचे स्पंदने तीव्र गतीने वाढु लागले " हि विचारात  होती तेवढ्यात आई ने तिला आवाज दिला .
ती - हो अग आले .
आई - अग ये लवकर , बघ कोण आले ।
ती - कोण आलंय ?
बाबा- अग बाहेर येणारेस का आता .
ती - बरं । आलेच
ती बाहेर येताच तिला धक्का बसला कारण तिने विचार पण नव्हता केला की असे काही होईल ते . तिच्या डोळ्यात एक प्रकारची भीती , अश्रू , आशा , नि हजार प्रश्न तिच्या डोक्यात रेंगाळत होती . तु Sssss , तू इथे काय करतोय नि या वेळी का? तेवढ्यात आई बोलली- अग त्याला बसायला सांगायचे  सोडुन चिडते का आहे त्याच्यावर .
ती - अग आई पण हा इथे का नि कश्याला आलाय , काय रे !! काय काम आहे तुला.
तो - काय काम म्हणजे , मी तुला मुळात भेटायला आलोच नव्हतो , मी तर काका काकुं ना भेटायला आलो . त्याचे बोलणे पूर्ण होत नाही तर बाबा मधेच बोलत , अग हाच तो ज्याने माझी मदत केली होती , आता मला हा रस्त्याने भेटला तर घेऊन आलो त्याला घरी , म्हटले की तुझी भेट घालवून देतो , तर तु चक्क चिडते आहे त्याच्यावर . काय झाले काय माहिती या वेडी ला उगाच चिडचिड करत असते आपली .
ती त्याच्या कडे रागात बघत खोटी खोटी हसत निघून गेली .
नाही म्हणता म्हणता थोडा का होईना त्यांच्यात सवांद झाला होता तो गोड तिखट का होईना पण सवांद तर झालाच ना . आणि तो पण खुश होत तिथून निघून गेला .




                                      दुसऱ्यादिवशी सगळे काही बद्दलेले होते. आज चक्क दोघे आनंदात होती , ती गेट समोर येऊन उभी राहिली तर चक्क येणारे जाणारे तिला गुलाब देत होते . ती गोंधळून अरे मला का देताय सगळे नि कोणी सांगितले तुम्हाला हे ? दुरून तो आपल्या हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छा घेऊन उभा होता आणि त्याची पहिली gf पण तिथे होती . अख्ख्या कॉलेज ला माहिती होते आज काय होणार होते . हिला मात्र त्याची कल्पना पण नव्हती .  ती थोडी लाजत , थोडी घाबरत पुढे आली . तिचा चेहरा लाल झालेला बघून तो हसला ,
ती - हे काय नि कोणासाठी ?नि हसायला काय झाले तुला ?
तो - कुठे काय , पण तू लाजत का आहेस ? नि लाल का पडलीस एवढी हा ?
ती - त्याला मारत , मग सगळे लोक हे गुलाब मला का देताहेत ? नि तू का असा नटून वैगेरे आलास .
तो - अरे देवा , ह्या लोकांना ना नीट काम पण नाही करता येत .
ती - म्हणजे ?
तो - अग नवीन मॅडम येत आहे , तर सगळे त्यांच्या साठी होते
ती रागात येऊन तिथून निघून जाणारच , तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला , वेडी ! कोणासाठी असेल हे , अर्थात तुझ्यासाठीच ना . आता plz वाद नको , "बहोत मुश्किल से दिल कि बाते इन ओठो पर आई हैं , अब इस वक्त को बिघडना मत पगली"  त्याला असे बघून ती  आचर्यचकित झाली . हळूच तिला जवळ खेचून तिच्या कपाळावरचे चुंबन घेत ,  त्याने तिला एकदाचे विचारले

तो - आयुष्यभर या देवदास ला सहन करशील का ?
ती - का ? मी कोण तुझी ?
तो - तु मैत्रीण तर नाही नि नाही माझे पहिले प्रेम .
ती - रुसून । मग कोण मी?
तो - वेडी । श्वास आहेस तु माझा , ज्याच्या शिवाय मी अपुर्ण आहे .
ती - लाजत ! छान बोलतोस , पण पचायला जड जातंय ..... (थोडी हसून )
तो -अच्छा जी , मस्करी च्या मूड मध्ये हा , ठीक आहे मग तुझी इच्छा
ती - गप ये , आधी खुप त्रास झाला आता नको,  बस!
तो- लग्न करशील .
ती - काय ! लग्न(ती थोडी  लाजत , थोडी हसत )
तो - का ?(आश्चर्यचकित होत )
ती - हिम्मत असेल तर घरी येऊन मागणी घाल
तो - आजच येतो . हळूच त्याने तिला आपल्या दोन्ही हाताने ओढले , और अपने बाहोमे ले लिया ......

सकाळ चा गजर होताच तो तातडीने उठला नि बघतो तर काय सकाळचे ६ वाजले होते आणि बाहों तकिया  थी
, अरेच्या स्वप्न होते तर ते , तिच्या घरून आल्यांनतर तिच्या एवढ्या विचारात मग्न झाला होता कि स्वप्नात पण तीच त्याला दिसून आली
धत 'तेरी कि , स्वप्न होते हे .....😓😓😓😓😓😓😓. 



क्रमक्ष :

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3