काय असत प्रेम ........


काय असत प्रेम ?
नकळत कोणाला तरी आपले
हृदय देऊन स्वतःला विसरणे  ।
चेहऱ्यावरील हावभाव लपवत
स्वतःचे एक जग तयार करणे ।।
म्हणजे प्रेम होय........

काय असत प्रेम?
त्याला भेटण्यासाठी ची उत्कटता
त्याला न सांगता अनुभावावी लागणे ।
त्याच्याच विचारात हळू हळू रात्री
मात्र एका कड्यावरून दुसरी बदलणे  ।।
म्हणजे प्रेम होय.......

काय असत प्रेम ?
कदाचित तो नसेल करत प्रेम माझ्यावर
ह्या भावनांशी झुंज करणे  ।
होकार की नकार असेल ह्याच विचारांची
डोक्यात गुंतागुंत होणे  ।।
म्हणजे प्रेम होय........

काय असत प्रेम ?
भूतकाळाशी नातं न ठेवता वर्तमान
घालवण्यासाठी झालेली ती तळमळ ।
भाविष्यकाळा साठी स्वतःवर क्षणर्थात
पाडलेली ती भुरळ ।।
म्हणजे प्रेम होय .........

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3