Posts

Showing posts from February, 2017

चाहुल...

चाहुल लागली नव्या प्रेमाची  सुरूवात झाली एका अध्यायाची  कल्पने पलीकडच्या नात्याची  डोळ्यातील लाजऱ्या स्वप्नांची  भावपुर्ण लाभली साथ तुझी  मी न राहिले स्वतः माझी  ओठांवर उमटू लागला  शब्द तुझ्याच नावाचा  आस लागली तुझ्या  हातात हात असण्याचा 

जुने दिवस....

नाही म्हणता म्हणता आठवले दिवस जुने .. गोष्टी बालपणाची  आणि जाणीव झाली खोडकरपणाची .... उभारले दृश्य ती गल्लोगल्ली फिरकी मारलेली .... कधी काळी उमजली नाती या बोबड्या शब्दांनी .... अजुनही  ती रस्ते वाटती आपुलकीची ..... नदीच वाहत पाणी जणू वाटे लखलखती हिऱ्याची चादरच .... आता सुद्धा शाळेची घंटा आणि ब्लैक बोर्ड आपले अस्तित्व गाजवत होती .....