मन मोकळ करू तरी कोणाजवळ कारण माझी म्हणणारी माणसं आता उरलीच कुठे अश्रू डोळ्यांमधून गालावर येऊन सुकून जातात मात्र ते पुसायला कोणाचा हात पुढे आलाच कुठे मनाच्या या युद्धात सगळ्या अशा आकांक्षा मरण पावत चालली कारण माझ्याकडून युद्ध लढायला कोणी आलेच कुठे अख्खा दिवस सरत जातो रात्र ही तिची तिची निघून जाते मात्र माझ्यासोबत थांबायला कोणी आलेच कुठे वसंता सारखी माझी पालवी गळून पडू लागली नवी येणार कि नाही हे माहिती नाही कारण त्याला पाणी घालायला कोणी आलेच कुठे
सांजवेळ झाली एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता तर दुसरीकडे तिचे डोळे पाणावले होते . मधेमधे विजा कडकडत होत्या नि त्याच्या प्रकाशाने तिचे ते अश्रू मोत्याच्या मणीप्रमाणे चमकू लागली . एका हातात डायरी तर एका हातात पेन , मन भरून आले , डोक्यामध्ये हजारो प्रश्न रेंगाळत होती. बाल्कनीमध्ये बसल्यामुळे पावसाच्या सरी तिला स्पर्श करू बघत होत्या , हवेचे गार झुळूक तिला धक्का मारून आपली वाट काढत होते , क्षणार्थात मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला . नाही म्हणता म्हणता तिचे अश्रू अनावर झालेत आणि ती हळूहळू हुंदके देत ती डायरी वाचू लागली . जुनी डायरी आणि...... तिचे प्रेम याचे combination म्हणजे तिचे लिखाण आणि त्याची शब्द . आवडत नव्हते तिला लिहायला मात्र त्याच्यामुळे ती लिहायला लागली होती .गाणी ,कविता , चारोळी , शायरी हे सगळे त्याच्याकडून ती शिकली होती . भावना व्यक्त करू लागली होती . डायरीचे पाने ती एकापाठोपाठ वाचू लागली......."आज त्याच...
मैत्रीचे प्रेम हे कधी पलीकडे गेले याचे भान हि मला राहिले नव्हते मात्र मला हे कधीच पटवून देता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही अश्रू तुझ्या डोळ्यात असायचे मात्र मन माझे हळवे व्हायचे झालेला हळवेपणा मला कधी दाखवताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही कित्येक आठवणी साठवून ठेवल्या , प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या मात्र त्या कधी तुझ्या समोर मांडता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही बघताच तुला मन फुलून यायचं , सगळी कडे आपला सुवास पसरून बेभान करायचं त्या फुलांचा सुगंध तुला देताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही नकळत तुझ्याशी तासंतास बोलायची , दाटलेल्या भावनांशी झुंज माझी चालायची ओठांवरचे शब्द तुझ्या कानापर्यंत पोहचवता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही होताच तुझा स्पर्श मला , थोडी लाजून जायची मी शहारलेल्या हात मग अलगद तुझ्या कडे सरकवयाची बिनधास्त तुझ्या मिठीत यायला मला कधी जमले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही
Comments
Post a Comment