बघ तुझे हे असे आहे ...

बघ तुझे हे असे आहे
प्रेम करतोस ते हि न सांगता
रागवतोस ते काही चूक नसताना
हसवतोस जेव्हा नाराज असताना
बघ तुझे हे असे आहे
कधी कधी कळत नाही मला
आपल्यात प्रेम आहे कि अजून काही
वागतोस कधी घट्ट असलेल्या मैत्री सारखा
तर कधी वाटे आयुष्याची संगिनी आहे मी तुझी
बघ तुझे हे असे आहे
अलगद डोळ्यावरील अश्रू पुसुन आपलंस करतोस
तर कधी रागात बोलून दूर साऱतोस
कधी प्रेमाचा वर्षाव करून प्रेम व्यक्त करतोस
तर कधी गर्दीत अनोळखी होऊन जातोस
बघ तुझे हे असे आहे ...... 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3