वहीचे पान ....

जश्या जश्या मनात साठत
जातात आठवणी तुझ्या
तसे तसे पाने भरत
 जातात वहीच्या माझ्या

शब्द ओठांवरची अलगद
सुरेख अक्षरात रेखाटली जातात
बघता बघता एकामागे
 एक पाने भरू लागतात

हळूच भरलेल्या पानांची
रंग बदलत जातात
तसेच नवीन जुन्या
आठवणी जाग्या होतात

तुझ्याबद्दल लिहायला
शब्द अपुरे नाही रे पडत
पण काही भावनांना
कागदावर नाही ना उतरवता येत

काही काळात वही तर भरून जाते
मात्र भावनांचा गंध ओलसरच राहते


Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3