इतिहास माझ्या राजधानी रायगडाचा ...

स्वर्गासारखा सुंदर नाही पण
थाट त्याहून अधिक माझ्या सह्याद्रीचा
ह्याच सह्याद्रीच्या पोटात वसे
इतिहास माझ्या राजधानी रायगडाचा
चोहूबाजूस  नांदती अनेक डोंगरे
खेळती खांद्यावरी पाऊस  नि उन्ह कोवळी
नको व्हावा त्रास जिजाउ मातेस म्हणुनी
बांधिला वाडा पाचाडजवळी
गाजवती आपले अस्तित्व महादरवाजा
दिसते दोन कमळाकृती शोभुनी
हळूच पडती दूरवर दृष्टी
उभा लिंगाणा , राजगड येती दिसुनी
मोठा इतिहास माझ्या या  गडाचा
कौतुकाने सांगे कथा गवळणी हिरकणीची
वाटे कुतूहल मज रचताना काव्यरूपी
सौदर्य ह्या माझ्या सह्याद्री रांगांची  

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3