रडतेय रे मन ....

रडतेय रे मन माझे तुझ्या या अबोला मुळे
सतत घुसमुट होतीये तू नसल्यामुळे
मान्य आहे चूक माझी मला
सतत तुला देतीये त्रास
गमावून नाही ना बसेल तुला
याचाच  होतोय भास
नको ना वाढवूस अंतर आपल्या मधले
नको ना ती  शांतता आपल्यात
हजारो प्रश्न रेंगाळतेय
माझ्या या मनाच्या भोवती
इथवर च होती का साथ
तुझ्या माझ्या नात्याची
सावरता सावरेना हे मन माझे
विसरता विसरेना हे प्रेम तुझे
खरच रडतेय रे मन माझे तुझ्या या अबोला मुळे
सतत घुसमुट होतीये तू नसल्यामुळे


Comments

Popular posts from this blog

कैद...

मी , तो आणि समुद्र .....

मैत्रीचे प्रेम...