वेडे हे मन...
किती रे वेडे हे मन माझे
कळलेच नाही कधी झाले तुझे
असा कसा उमटून गेलाय मनात ठसा
हल्ली त्या प्रेमाचा होतोय आभास असा
दिसत ते त्या पावसाच्या सरीमध्ये
जाणवतो त्या गार हवेच्या स्पर्शामध्ये
शोभतो त्या झाडाच्या पानांवरच्या थेंबामध्ये
मिसळून जातो त्या मातीच्या सुवासामध्ये
कोणास ठाऊक ऐवढे कसे वेडे हे मन
तुझेच गाऊ लागले वेळोवेळी गुणगान
Comments
Post a Comment