अरे देवा....

आज परत पाऊस पडणार नि आपण भिजणार
नकळत हातात हात येऊन  
सरींचा आपल्यावर वर्षाव होणार 
त्यात ढगांच्या गडगडाट मुळे हात घट्ट होणार 
चमकणाऱ्या त्या विजा मधेमधे focus टाकणार 
मी हळूच सरी हातात घेऊन तुझ्याकडे फेकणार 
तुझा लाल झालेला चेहरा मला थोडं घाबरवणार 
मग तू गालातल्या हसून मला रागावणार
अरे देवा  . . . . . . . . . .
मग परत मी तुझ्या प्रेमात पडणार
सावकाश पणे पाऊस कमी होऊ
ते सोनेरी उन्ह मधेच डोकवणार
सूर्याच्या त्या किरणांनी आपलं प्रेम
सात रंगात रेखाटले जाणार
पावसाची आणि उन्हाची या मस्तीमध्ये
प्रेम आपले नव्याने फुलणार .... . . . .


Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3