मोबाईल ची स्क्रीन......

हल्ली फक्त मोबाईल ची स्क्रीन स्क्रोल होते
तुझ्या msg ची वाट बघत झोपी जाते
आता येईल तुझा msg नि काढशील माझी समजूत
सतत मनाला वाटत गेले
तू online असून पण नसलेला तुझा msg
काळजाला भिडून जाऊ लागले
विचार येतो तो एकच खरंच आपल्यात नव्हते
ते प्रेम , नव्हत्या  त्या भावना , नव्हती ती मैत्री
घालवलेले ते क्षण नाही का आठवत तुला
झालेली ती वाद नाही का लक्षात तुझ्या
हळूच माझी मस्करी करत माझा राग घालवणे
कसे नाही रे जमले तुला
थोडं रागावून ,थोडे प्रेमाने का नाही थांबवुन घेतले मला
मी हात सोडला तर का नाही घट्ट करून ठेवलास
मी पाठ फिरवल्यावर का तू पण फिरवलीस कायमची ........
हाच विचारत करत मोबाईल ची स्क्रीन स्क्रोल होत होती ......... 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3