कधी काळी व्यक्त होण्यासाठी तुला लिहून काढायची आता मात्र तुझ्याकडे बघुन शब्द बंद झाली सुचायची व्यक्त होताना तेव्हा शब्दात गुंतून जायची मी आता मात्र तुझ्या डोळ्यात कैद होऊन जाते मी
जेव्हा जेव्हा तुझ्या कुशीत येऊन तुझ्या हृदयाचे ठोके ऐकत असते त्यावेळी ते मला जगातले सर्वात सुंदर गीत वाटते मग मी हळूच तुझ्या डोळ्यात बघून ते वाचण्याचा प्रयत्न करते नी कसली जादू त्यातही मला माझेच प्रतिबिंब दिसून जाते आणि नकळत हळूच माझ्या गालांवर लाली चढून मी लाजून जाते याची मात्र तुला जरा ही खबर नसते.....
मैत्रीचे प्रेम हे कधी पलीकडे गेले याचे भान हि मला राहिले नव्हते मात्र मला हे कधीच पटवून देता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही अश्रू तुझ्या डोळ्यात असायचे मात्र मन माझे हळवे व्हायचे झालेला हळवेपणा मला कधी दाखवताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही कित्येक आठवणी साठवून ठेवल्या , प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या मात्र त्या कधी तुझ्या समोर मांडता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही बघताच तुला मन फुलून यायचं , सगळी कडे आपला सुवास पसरून बेभान करायचं त्या फुलांचा सुगंध तुला देताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही नकळत तुझ्याशी तासंतास बोलायची , दाटलेल्या भावनांशी झुंज माझी चालायची ओठांवरचे शब्द तुझ्या कानापर्यंत पोहचवता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही होताच तुझा स्पर्श मला , थोडी लाजून जायची मी शहारलेल्या हात मग अलगद तुझ्या कडे सरकवयाची बिनधास्त तुझ्या मिठीत यायला मला कधी जमले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही
Chhan lihil
ReplyDelete