एकतर्फी प्रेम....

तुझी सवय होऊ नये म्हणून
सतत तुला टाळत असते ....
कारण प्रेम  माझे एकतर्फी
म्हणून तुझ्याकडे ओढल्या जाते .....
तुला चोर नजरेने बघून तुझाच चेहरा
वाचण्याचा माझा प्रयत्न चालू असते......
ओठांवर हसू तुझ्या आणि मी
मात्र गालातल्या गालात लाजून जाते .......
तुझं पण मन माझ्यासाठी झुरत का ?
हा एकच प्रश्न सतावत राहतो ......
नि डोळ्यांचा परदा अलगद उघडून
"वेडे एकतर्फी प्रेम ना तुझे "हे सांगून जातो ......
दिसताच तू अबोल झाल्यासारखे वाटते  ....
जाताच तू काही हरवले असे जाणून येते ....
रोज तुझ्या वळणावर डोळे टिपून बसले असते....
आज तुला उमजणार माझे प्रेम हि आशा उराशी जपत असते .....

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3