नेमकं प्रेम कि मैत्री ...

नेमकं प्रेम कि मैत्री या प्रश्नावर येऊन थांबते
गुंतलेले  हे मन काही केल्या माघार घेत नव्हते
दचकून पाय अडखळावे  तसे
माझ्या या विचाराचे व्हायचे
चौफेर पसरलेल्या त्या तिमारामधून
अलगद आशेची छवी दिसल्यागत व्हायचे
आज ओंजळीमधील फुले रोजच्या
पेक्षा जास्त सुगंध पसरवू लागली
नाही म्हणता म्हणता मी तुझ्यात
हळुवार पणे गुंतत चालली 
शोधू लागली नवी नवी कारणे
रोज तुझ्याशी बोलण्यासाठी
रमून जाते तासंतास आजकाल तू
न केलेल्या गप्पांमधी
न चुकता ,न विसरता, हल्ली मी
तुझ्याच बद्दल बडबडत राहते
प्रत्येक्षात काय तर स्वप्नात सुद्धा
तुझ्याच प्रेमाचे गुणगान गात राहते




Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3