आपुलकी..............

कविता सुचाव्या असे
विषयच उरले नाही
विषय सुचला तरी
शब्द मात्र फुटत नाही
            शब्द सुचला तर
            अर्थ निघत नाही
            नि अर्थ जुळला तर
            भावना तश्याच कोरड्या
ओलावा मिळतो तो
फ़क्त आपुलकीचा
मात्र ही आपुलकीच करणारे
जीवनात भेटत नाही
           भेटले तरी नाही त्या
           आठवणी देऊन जातात
           नि शेवटी काय
           आयुष्यात फ़क्त आठवणीच राहतात

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3