मनातील शब्द . . .

मनातील  शब्द . . . 

नाती वाळू  वर लिहा अथवा मनामधे
अर्थ तोच
वाळू वर लिहिलेली नाती
समुद्राच्या लाटेने वाहून जाईल
मात्र मनात लिहिलेली नाती
कायम स्वरूपी आठवणीत राहतील



नात्यांमधे गुंतायला वेळ लागत नाही
वेळ लागतो तो नाती समजायला



मनाच्या एकांत आणि
हृदयाचे ठोके आज
असे काही वाढू लागले
की जणू काही
पावसामधला तो पाण्याचा
थेंब जमिनीवर यायला तरसु लागला
जसे त्या थेंबाचे नि जमिनीचे
नाते वर्षानुवर्षे असावा



नाती असतात पण माहिती नसतात
अफाट अश्या या भयान जगात
असत कोणी तरी आपले
असत कोणी तरी अगदी जवळच


प्रेमाच्या भाषेला
मनाच्या भावनेचा आधार
जसा भव्य सागराला
किनाऱ्याचा आधार




Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3