मी , तो आणि समुद्र ..... 2



               त्या दोघी आता किनाऱ्याच्या दिशेने धावू लागल्या. सई अंतरा ला खेचून समुद्राच्या दिशेने घेऊन जात होती . रोजच्या जागेवर सई आणि अंतरा येऊन बसल्या आणि गप्पा करू लागल्या . अर्धा तास झालेला मात्र निलचा अजून पर्यन्त पत्ता नव्हता . तीचा उत्साह आता रागात रूपांतर करून गेला . कुठेय हा , आला का नाही , मुद्दाम तर  नसेल ना आला , पण आज काय झाले असेल?.......त्याला काही झाले तर नसेल ....(नाही नाही असे मनात ती पुटपुटली ). आता तिचा राग त्याच्या काळजीमध्ये बदले होते . ती व्याकुळ होऊ लागली , नानाप्रकारचे विचाराने तिचे मन भरून आले , १तास उलटून गेला होता . एव्हाना तो येऊन जातो मग आज काय झाले (सई अंतरा ला सांगत)? आज ती निराश झाली होती एकूण ४५ दिवसांमध्ये हे पहिल्यांदा घडले होते सई आणि निलची भेट झाली नव्हती . सई अंतरा ला म्हणत ....ऐकना!तू जा घरी मी थांबते थोड्यावेळ इथे, कदाचित तो आला नि मी इथे नसेल तर तो गोंधळून जाईल . अंतरा तिला विनवणी करू लागली नको तू चल आपण घरी जाऊन यावर बोलू . सई काही केल्या ऐकत नव्हती,शेवटी अंतरा तिथून निघून गेली . 



                     सई एकटक समुद्राच्या लाटांकडे बघू लागली . खवळलेल्या त्या लाटा तिला वाकवल्या दाखवत होत्या . जणू तिची हार झाली हे तिला दर्शवत होते . हळूहळू सगळीकडे शांत वातावरण झाले . चंद्राचा संथप्रकाश समुद्राच्या पाण्यात पडू लागला , चांदणे चंद्रामुळे लखलखीत करीत होत्या . सई भानावर आली आणि हातात वाळू घेऊन पाण्यात फेकू लागली . तिचा तो राग अनावर झाला होता . काही हि न बोलता तिने घराचा मार्ग धरला . तेवढ्यात लांबून कोणीतरी येतंय अशी चाहूल सईला लागली , ती मात्र लक्ष न देता आपली पाऊले उचलू लागली . थोडं जवळ येताच सईला निल दिसला तेच तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले . त्या प्रकाशात ते दोघे हि न्हाहून निघाले होते . गारवारा त्यांना छेदून जात होता , लाटा पायांना स्पर्श करून जात होते त्याच वाळुमुळे पायांना गुदगुल्या होऊ लागल्या होत्या . डोळ्यात अश्रू , गालावर हसू , मनात प्रेम आणि डोळ्यात खुप सारे प्रश्न . तोच निल तिला बोलतो ..........
निल- तू ? तू इथे काय करतेय नि एवढ्या रात्री? किती काळोख झालाय नि तुला भीतीबीती आहे की नाही ? (सई त्याच्याकडे बघतच होती ) ये वेडाबाई मी तुझ्याशी बोलतोय . लक्ष कुठेय तुझं .
सई- (भानावर येऊन , कावरीबावरी झालेली) हा .....
निल- काय , घरी का नाही गेलीस आज .
सई- हा! ते जात होते . एक मिनिटं तू आता का आलास इथे ?
निल - हो .....खूप वेळ झाला तसा , पण आलो ५ मिनटांसाठी.
सई- अच्छा ........
निल- मग ..... जा तू घरी वेळ झालाय बघ .
सई- हो .....(डोळ्यात अश्रू साठवून) (तेवढ्यात)
निल- तुझं नाव काय ? नाही म्हणजे आपण गेल्या काही दिवसांपासून ओळखतो पण तुझं नाव नाही माहिती . काय नाव तुझं ?
सई - सई ..... माझं नाव .....तुझं?
निल- (थोडा हसून) निल .
सई - ohk चालेल मी निघते आता . आणि ऐक ना उद्या येणारेस का .
निल- हो.... येणारे (निल ला थोडी हिंट आली होती ) का ग ?
सई - असच ( थोडी घाबरून)
निल - जा आता घरी आपण उद्या बोलूया . उद्या ४ वाजता . चालेल ना तुला .
सई - (आनंदात)हो चालेल !  bye निघते मी आता.
तो एक क्षण दोघांसाठी खुप महत्वाचा होता , कारण दरवेळी नजरेने होणारा सवांद आज शाब्दिक झाला होता .दोघे हि घरी जाऊन निश्चिंत झोपी गेले .



                      दुसरा दिवस उजाळला सई आज चक्क नटू लागली हे बघून अंतरा ला समजायचं ते समजून चुकले . सई अंतरा कडे बघत चल जाऊया लवकर  ऑफिसला ,आज "हाल्फ डे" घेणारे मी माहिती ना तुला . त्यावर अंतरा बोलली - हो माहिती आहे , तू आरशासमोरून सरकशील तेव्हा च निघू ना आपण .( सई लाजत ) हो हो ....... सईने आजचा दिवस कसाबसा ऑफिस मध्ये काढला होता  , वेळ बघत बघत ती मनात पुटपुटली रोज तर लवकर लवकर फिरतो हा काटा ,आज काय झाले मेल्याला .... कदाचित घड्याळने सुद्धा हिचे ऐकले असा ,साडेतीन झाले नि मेल(mail)टाकत , सिस्टिम बंद करत स्वतःची बॅग उचलुन ती धावत सुटते . किनाऱ्याजवळ येऊन पोहचते थोडा दीर्घ श्वास घेते आणि एक एक पाऊल पुढे सरसावत ती पाण्याकडे बघते . एकीकडे निल तिची वाट बघत पाण्याच्या लाटांबरोबर खेळत होता . दुरूनच निलला सई दिसली तो स्वतःला सावरत तिला एक स्मित हास्य देत " या या तुमचीच वाट बघत होतो मी " ,बरोबर वेळेवर आलीस की तु (हसत) .
त्यावर सई चे उत्तर - हो तर ........ आज वेळ नव्हती रे चुकवायची मला . निल सईला खुणावत , बसूयात इथे , हो हो चालेल म्हणत सई खाली बसली नि तिच्या पाठोपाठ निल पण बसला . मग.... आज एकटा कसा काय ? सई ने विचारले . हा तुला भेटायचे होते ना म्हणून ..... निल प्रतिउत्तर देत .
सई- अच्छा....
निल - हा ......
दोघांना आता सुचायला अवघड होत होते , कारण कधी हि त्यांच्यात सवांद झालेला नव्हता म्हणून आता पुढे काय बोलायचे हा प्रश्न दोघांपुढे येऊन थबकला .  गेल्या ३० मिनिटामध्ये ते फक्त मनात बोलत होते , कारण ओठांवरचे शब्द नाहीसे झाले , नजरेला नजर भिडली तेच सई ने लाजत आपली नजर लाटांकडे वळवली . हात थरथरायला लागली , काय बोलायचं , कसे बोलायचे , महत्वाचे म्हणजे सुरुवात कोठून करायची हे दोघांनाही सुचत नव्हते  . हुश्श .... काही म्हणालास का तु?
निल - नाही काही नाही
सई - निघायचं का आपण वेळ झालाय .
निल- (मनातल्या मनात  नको ना थांब थोड्यावेळ) चालेल . उद्या भेटूया ह्याच वेळेला .
सई - चालेल ....निघते मी .
निल- हो , काळजी घे.... अअअअ मी फोन करू का तुला ? म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नसेल तर .
सई -(स्मितहास्य देत) हो चालेल,  माझा नंबर ?
निल - हो , सांग . दोघेही नंबर एकमेकांना बदलून देतात.
             आज दोघे हि एका वेगळ्याच विश्वात होते , नकळत ती दोघेही स्वप्न रंगू लागली . मात्र निल च्या मनाची घालमेल ती सुरूच होती , अस्वस्थ झालेल्या निलला काहीच कळत नव्हते . हे वाईट आहे की चांगले याचा अंदाज त्याला लागत नव्हता , काय करू? कसे करू? असे अनेक विचारांनी तो गोंधळून गेला . तिला सगळे सांगायचे ठरवले तरी सुरुवात कुठून करायची हाच महत्वाचा प्रश्न त्याच्या पुढे येऊन उभा राहायचा  आणि तिला सगळे सांगितले तरी ,  ती माझा स्वीकार करेल का?  की मला सोडून जाणार ती ?याच प्रश्नांशी तो झुंजत होता . आणि एकीकडे सई आपल्या आयुष्याची पुढची वाटचाल त्याच्याबरोबर घालवण्याची स्वप्न बघू लागली . निल आणि सईचे प्रेम प्रत्येक दिवशी नव्याने फुलू लागले .गप्पागोष्टी , भेटीगाठी, समुद्रासपाठी वर तासंतास घालवणे हे आता रोज चे झाले होते . ते दोघे नव्याने एकमेकांना ओळखू लागले , समजून घेऊ लागले मात्र हे सगळे होत असताना निल कुठे तरी अस्वस्थ होताच हे नक्की .
                      सकाळी सकाळी सईने निलला कॉल केला . आज जरा तुझ्याशी बोलायचं आहे नि आज सुट्टी असल्यामुळे मी निवांत आहे तर आपण भेटायचं का ? निल तिला एका वाक्यात हो बोलून मोकळा झाला . सईला जाणून आले आज याचे काही तरी बिनसले आहे, नाहीतर तासंतास गप्पा करणार हा एका वाक्यात बोलून फोन ठेवणाऱ्यातला नाही . सईने सांगितल्या प्रमाणे निल सागरीकिनाऱ्यावर येऊन पोहचला आणि थोडा हि विलंब न होता सई पण तिथे आली . आज सई वेगळीच दिसत होती , गोड , हसरी , थोडी नटून आलेली तिला असे बघून निलला भारी वाटले , आज परत नव्याने तो तिच्या प्रेमात पडला . तेवढ्यात निल सईला बोलतो आज काही विशेष आहे का ?
सई - का रे , असं का विचारतोय
निल- खुप गोड दिसतेय आज , आयुष्यभर अशीच हसत रहा


सई - हो नक्की ! तू आहेस की आता आयुष्यभर माझ्या बरोबर, मग काय मी अशीच असेल तुझ्या सहवासात , तुझ्या प्रेमात .
निल- (थोडे डोळे पाणावत) ह्म्म .
सई- चल.....
निल- कुठे?
सई - चल ना (त्याचा हात पकडत त्याला दाखवलेल्या दिशेने घेऊन जाते ) बस आता खाली .
निल- किती ग तो बालिशपणा , बरं बोला आता काय .
सई - एक कविता ऐकवू का ? आता सुचली तुझ्यासाठी  .
निल - खरच , आवडेल मला ऐकायला
सई -----
"बोलके व्हावे मन हे
माझे सांगावे प्रेम तुझे
नयनी रचले स्वप्न
आज  होईल का ते पूर्ण?    

भान माझे मला ना आता
कसली बेचैन मनाला
ओठ आतुरलेत सांगावया
कहाणी आपली ती दुनियेला

हळूच नकळत येतोस
ध्यानी का रे हा लपंडाव
हात माझे बोलवती जवळी
मिठीत मला घेशील का ?

होऊन मी बेधुंद आज
प्रेम ते आपुले जानियेले
ओलांडते उंबरठा तुझ्या
मनी चा साथ तू देशील का ?

नको आता दुरावा
आपल्यात नको ती शांतता
सात जन्मी तू माझा वचन
बद्ध करशील का?

हरवून गेली तुझ्यात मी
अशी विसरली स्वःताला
मीच मला सापडेल तुझ्या
जवळी हे कारण मला देशील का ?"

निल- (तिच्याकडे बघत) बापरे तू एवढी छान लिहितेस माहिती नव्हते मला नि तू सांगितले पण नाहीस .
सई - तुझ्या कडे बघून ते आपोआप सुचत रे . बरं कशी वाटली कविता सांग ना (थोडी लाडात येत) .
निल-अग खुप छान लिहिलंस आणि तुझे शब्द तुझ्या ओठांमधून ऐकण्यात एक वेगळीच मज्जा आहे बघ .
सई- (त्याचा हात आपल्या खांद्यावर घेत) हल्ली कविता फक्त तुझ्याच साठी लिहिते मी .
निल- अरे वाह ! (शब्दहीन होऊन)
सई- काय झालंय ? तू बोलत का नाहीये , काही झाले का ? एवढा का उदास आज तू ? सांग ना मला , घाबरायला होतंय रे तुला असे बघून .
निल- अग राणी! काहीच नाही बस तुला बघून तुझ्यात दंग झालोय बाकी काही नाही , नि तू सोबत असताना मला कसली काळजी हा .....
सई- नक्की ना !
निल- हो ....
   दोघे हि एकमेकांत गुंतून गेले  . निल सईचे बोलणे ऐकत होता . मधेमधे सई थोडी बालिशपणा करत होती हे बघून निलला तिचे अजून कुतूहल वाटायला लागले . कारण त्याला जशी हवी होती सई तशीच ती  होती . त्याला सांभाळून घेणारी , त्याचे सगळे ऐकणारी , समजून सांगणारी . निल मनोमन देवा कडे एकच मागू लागला की जेवढे दिवस माझ्या कडे आहे तेवढे दिवस तरी मला हिच्या बरोबर घालवू दे . मधेच सई वाळूवर त्या दोघांचे नाव लिहू लागली आणि गाऊ लागली , निल पण तिच्या गाण्यात तिला साथ देऊन तिचा हात पकडतो . आणि स्वतःकडे खेचतो , ऐक मला तुला काहीतरी सांगायचे आहे .
सई- अच्छा ! उगाच थापा नको मारुस हा तु (हसत).
निल- सई SS.   ऐकशील का माझं  खुप महत्वाचे आहे राणी . (गंभीर होऊन)
सई - अरे बापरे !काय झाले ? काय सांगायचे आहे , बोल बोल पटकन बोल.
निल- (शांत होऊन)
सई- अरे बोल ना
निल- हो ........ माझं खुप प्रेम आहे तुझ्या वर , मात्र .....
सई- तए माहिती आहे मला ....आणि हे  "मात्र काय"
निल -(जे सांगायचे होते ते न सांगता) मला माझं आयुष्य काढायचे तुझ्या बरोबर .
सई- मी तयार आहे .(लाजत)
निल - कसा काय विश्वास ठेवते तू माझ्यावर येवढा.
सई- प्रेम करते मी तुझ्यावर एवढा विश्वास तर हवाच ना .
निल- निघायचे का? वेळ झालाय .
सई - हो चालेल .
दोघे हि एकमेकांकडे बघत होते तेवढ्यात सईने निलच्या गालाचे चुंबन घेतले . चल मी निघते , काळजी घे स्वतःची , मी आल्यावर घेईलच तुझी काळजी 😘. निल तिचा हात पकडतो , आणि तिला जवळ घेऊन कपाळाचे चुंबन घेत म्हणतो .... नीट जा .
सई - हो (लाजत) 
दोघे हि आपल्या वाटेने निघायला लागतात

क्रमक्ष:....

Comments

  1. खूप छान लिखाणात कसे काय कुठे वापरावे हे छान कळते
    शब्दात आर्तता आहे सस्पेंनस पण आहे पुढची स्टोरी ची वाट पाहत आहोत लवकरच वाचला मिळेल ही अपेक्षा.
    कळावे

    ReplyDelete
  2. Feels like it’s happening right in front of me. Anxious about what happens next.

    ReplyDelete
  3. खुप सुंदर लिहिलंय..... पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा.... आता नेक्स्ट पार्ट च्या प्रतीक्षेत❤️❤️

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. सगळ्यांचे मनापासून आभार ..... पुढला पार्ट अपलोड केलाय लिंक खाली दिली आहे

    next part

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3