पहिली भेट....

नियतीने करून दिलेली भेट त्यांची पहिली
बाणातून तिर निघावा तशी त्यांची नजरेला नजर भिडली.......
मोठया ऐटीत मिरवणारा त्याचा
तो रुबाब तिच्या समोर मात्र शून्य झाला .......
तिच्या त्या मधुर स्वरावर नि गोड
हास्यावर तो जाम फिदा झाला .......
आता रोज त्याचे चोर नजरेने
तिच्याकडे पाहणे सुरु झाले .......
मित्र-मैत्रिणीत रंगणार तो आज
तिच्या स्वप्नात रंगून गेला.......
तिच्या त्या एक झलक साठी तो वाटेल
ते करायला  तयार झाला.......
पाहता पाहता त्याने ठरवले
करावं का खुलासा आपल्या प्रेमाचा
दिवस ठरवला , वेळ ठरवली एवढंच
नाहीत तर पद्धत पण ठरवली
आज तो दिवस होता ज्याची
तो मनापासून वाट बघत होता .......
एकीकडे हृदयाची धकधक तर दुसरीकडे
मनाची घालमेल होऊ लागली होती .......
डोक्याने मात्र शांतता पाळली होती.......
होकार देईल कि नकार हे दोन विचार
नदीचे दोन किनारे जसे जुळवू शकत नाही तसे
या मध्ये पण काही जुळवा - जुळवी नव्हती.......
डोकं सांगतंय नको मन बोलतो अरे बोलून टाक
 शब्द नाहीसे झाले, काय बोलू तिच्याशी
 हा मात्र नाही त्या गोंधळात पडला .......
अखेर तो तिच्या समोर येऊन थबकला .......
हातात गुलाब नि मनात प्रेम घेऊन तो तिच्या डोळ्यात पाहू लागला .......
बोलायचं तुझ्या बरोबर म्हणून त्याने तिला थांबून घेतले .......
"प्रेम करतो तुझ्यावर खूप" हे क्षणर्थात सांगून टाकले .......
तिने हि लाजून मान हलवत आपले प्रेम व्यक्त केले .......
अश्या प्रकारे त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरु झाला....... 

Comments

  1. पल्लवी खूप छान लिहतात ब्लॉग carry on

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कैद...

मी , तो आणि समुद्र .....

मैत्रीचे प्रेम...