माझी शाळा....

काल माझ्या स्वप्नात माझी शाळा आली
विसरलीस ना मला म्हणून तक्रार करू लागली
परत एकदा तिने तिची स्वतःची ओळख
करून दयायला सुरुवात केली   ........
आठवते ना तुज म्हणुन केलेली मस्ती नी
खोडकरपणाची चित्रे डोळ्यासमोर उभी केली
माझ्याच अंगा-खांद्यावर लहानाचे मोठे
होऊन आज इथवर पोहचली  ........
पावसाळ्यात  दांडी तुम्ही मारायचे  पण
वाईट मात्र मला वाटायचे
भर उन्हात शिक्षा तुम्हाला व्हायची पण
त्या उन्हाचे चटके मला लागायचे  ......
कधी हळुहळु तुम्ही मुले मुली मोठे होत गेलात
नि मी म्हातारी याचे भान मला ही नाही राहले
आज माझ्या भिंती , माझ्या डोक्यावरचे छप्पर
माझ्याबरोबर आहेत , मात्र तुमची कमी जाणवू लागले .......
आठवतो का तो गणिताचा तास , घरचा अभ्यास न करता
कुठे तरी शाळेच्या कोपऱ्यात लपायचेत
आणि मराठीच्या तासाला मोठं मोठ्यांनी
पद्याला ताल सुरात गावुन माझे कान फाडायचेत........
विज्ञानाच्या तासाला वाटे जणू आज हि मुले आलेच नाही
म्हणुन कुठे तरी मी हिरमुसून जायची
आठवतात का रे तुम्हा लोकांनां माझ्या मैदानात
खेळुन खेळुं आपले पाय मोडुन घायची .......
आठवते का रे  "माझी शाळा , माझी शाळा " म्हणुन
माझ्यावर  निबंध नि कविता लिहिलेले
कि माझ्या बरोबरच विसर पडायला त्या
लेखनाचा नि भावनाचां, ज्या होते मी गुंतलेले  ..... 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3