जुने फोल्डर......

लॅपटॉप मधले जुने फोल्डर चुकून झाले ओपन
खूप सोनेरी क्षण ठेवलेले होते त्यात साठवून
एका पाठोपाठ एक आठवणी जमा होत गेली
आणि जुन्या मात्र कुठे तरी विरळ होत चालली
त्यावर आज काल चुकून का होई ना
लक्ष काही जात नव्हते
असेच धूर खात त्याचे अस्तित्व नाहीसे झाले होते
असे ढीगभर फोल्डर वर फोल्डर तयार होत गेली
आणि लॅपटॉप ची स्टोरेज डिस्क फुल होऊ लागली
Delete करावे म्हटले तर काय काय delete करू
मनात साठलेले ती लोक कसे त्यांना format करू
हे दुःख पण एका virus सारखा पसरत जातंय
हाच एक विचार येतो कि Antivirus टाकायचे तर
कुठल्या आनंदाचा ब्रँड याला द्यायचं 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3