भातुकलीचा खेळ .....

ह्या अबोल्यामध्ये एक वेगळेच प्रेम दडले
नाव तुझे आयुष्यभर माझ्या हृदयात कोरले
तू बोल अथवा नको बोलूस तुझे डोळे नि श्वास
सगळे काही सांगून जात आहे
रागात पण खुप गोड दिसणारा तु
तुझ्या स्मित हास्याची थोडी कमी आहे
जेवढा लांब जाण्याचा तुझा प्रयन्त असेल
तेवढा तुझा पाठलाग मी करत राहील
जेवढी फिरवशील पाठ तू
तेवढे तुझ्या समोर येऊन उभी राहील
प्रेम केले आहे मी तुझ्यावर असे कसे बरे कमी होईल
लाख प्रयन्त कर मला विसरण्याचा मी बरे विसरू देईल
नको ती सोडून जाण्याची भाषा आपल्यात हवे
तर भांड किंवा रागाव रे तू माझ्या वर
 कळतंय मला व्यथा तुझ्या मनाची
प्रेम तुझे खुप आहे माझ्यावर
नको मला तो आठवणीतला पाऊस नि ऊन सावलीचा खेळ
आता खरी वेळ आलीये खेळायचा तो भातुकलीचा खेळ 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3