अव्यक्त प्रेम....

स्वप्नात जरी तू असलास
तरी  स्वप्न ते फक्त माझे आहे
जरी मनात  नाही मी  तुझ्या मात्र
माझ्या या हृदयात तुझंच राज्य आहे
ओठांवर नसेल शब्द प्रेम व्यक्त करण्यासाठी
पण मनात तुझ्याच नावाची कविता चालू आहे
जागत राहते हल्ली तुझ्या आठवणीत आणि
रमत असते त्या तारेच्या विश्वात
कारण आठवते मज , कधी काळी मोजली
होती मी त्यांना तुझ्या सहवासात
हरवून बसते कधी कधी त्या समुद्रा काठी का तर
माझ्या प्रेमाची शब्द उमटली होती त्या चिंब वाळूवरती
स्वतःच स्वतःला देत दिलासा रेखाटू लागली
सप्तर्षी रंगाचा सूर तो त्या बेधुंद इंद्रधनुष्यावरती
उजळलेल्या त्या अनंत निशब्दांचा थवा आणि
साथ लाभली ती दरवळणाऱ्या प्रेमाच्या सुगंधाची
खरच किती हा गोड लपाछपीचा अनुभव , नि
आनंद वाटतो तो अव्यक्त झालेल्या प्रेमाची 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3