सुख ...

सुख म्हणजे काय असते 
हळूच बाबांच्या मिठीत
जाऊन दिलेला तो
गोड पापा असतो ॥
 सुख म्हणजे काय असते
डोक्यावरून आईने मायेनी
फिरवलेल्या हाताची ऊब असते ॥
सुख म्हणजे काय असते
एकाच वस्तुसाठी ताईशी
झालेले भांडण असत ॥
सुख म्हणजे काय असते
दादु जवळ एखाद्या वस्तुसाठी
केलेला हट्ट असतो ॥
सुख म्हणजे काय असते
रुसलेल्या मित्र-मैत्रिणी
समोर उठक बैठक करुन
त्यांच्या चेहर्यावरील हसु असत ॥


Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3