बोलके मन .....



बोलके व्हावे मन हे 
माझे सांगावे प्रेम तुझे, 
नयनी रचले स्वप्न आज  
होईल पूर्ण ते 

भान माझे मला ना 
आता कसली बेचैन मनाला ,
ओठ आतुरलेत सांगावया
कहाणी आपली ती दुनियेला 

हळूच नकळत येतोस ध्यानी
का रे हा लपंडाव ,
हात माझे बोलवती जवळी
मिठीत मला घेशील का ?

होऊन मी बेधुंद आज
प्रेम ते आपुले जानियेले 
ओलांडते उंबरठा तुझ्या 
मनीचा ,साथ तू देशील का ?

नको आता दुरावा 
आपल्यात नको ती शांतता 
सात जन्मी तू माझा, वचन
बद्ध करशील का? 

हरवून गेली तुझ्यात मी
अशी विसरली स्वःताला
मीच मला सापडेल तुझ्या जवळ,
हे कारण मला देशील का ?

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र .....