आज कदाचित माझी नि तिची भेट व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना तो करू लागला , डोळ्यात नवी स्वप्न आणि मनात नवी आशा घेऊन तो कॉलेजसाठी तयार झाला . आज ती कॉलेजला येईल नि माझं तिच्याशी बोलणे होईल असे त्याला मनोमंन वाटू लागले . रोज उशीरा येणारा तो आज अर्धा तास आधीच येऊन पोहचला . आज तो खुश आणि प्रसन्न दिसत होता , अचानक त्याला ती दिसली, आज खुप गोड नि सुंदर दिसत होती ती , लाल ड्रेस , केस खुले सोडुन , चेहऱ्यावर स्मित हास्य , ओठांवर लाल लिपस्टिक , हिलची सॅन्डल , आणि मधून मधून पडणाऱ्या सुर्याच्या किरणाने अजुन तिचे रूप खुलवून गेले होते , "तेरी याद में तबियत "मचल" जाती है...!! वक़्त-ए-शाम की सूरत "बदल" जाती है...!! जब तीर ख्यालों का "चुभता" है जिगर में...!! तो मेरे सब्र की नीयत "पिघल" जाती है..." ...