Posts

मी , तो आणि समुद्र ..... 2

Image
               त्या दोघी आता किनाऱ्याच्या दिशेने धावू लागल्या. सई अंतरा ला खेचून समुद्राच्या दिशेने घेऊन जात होती . रोजच्या जागेवर सई आणि अंतरा येऊन बसल्या आणि गप्पा करू लागल्या . अर्धा तास झालेला मात्र निलचा अजून पर्यन्त पत्ता नव्हता . तीचा उत्साह आता रागात रूपांतर करून गेला . कुठेय हा , आला का नाही , मुद्दाम तर  नसेल ना आला , पण आज काय झाले असेल?.......त्याला काही झाले तर नसेल ....(नाही नाही असे मनात ती पुटपुटली ). आता तिचा राग त्याच्या काळजीमध्ये बदले होते . ती व्याकुळ होऊ लागली , नानाप्रकारचे विचाराने तिचे मन भरून आले , १तास उलटून गेला होता . एव्हाना तो येऊन जातो मग आज काय झाले (सई अंतरा ला सांगत)? आज ती निराश झाली होती एकूण ४५ दिवसांमध्ये हे पहिल्यांदा घडले होते सई आणि निलची भेट झाली नव्हती . सई अंतरा ला म्हणत ....ऐकना!तू जा घरी मी थांबते थोड्यावेळ इथे, कदाचित तो आला नि मी इथे नसेल तर तो गोंधळून जाईल . अंतरा तिला विनवणी करू लागली नको तू चल आपण घरी जाऊन यावर बोलू . सई काही केल्या ऐकत नव्हती,शेवटी अंतरा तिथून निघून गेली .  ...

मी , तो आणि समुद्र .....

Image
                                                    सांजवेळ झाली एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता तर दुसरीकडे तिचे डोळे पाणावले होते . मधेमधे विजा कडकडत होत्या नि त्याच्या प्रकाशाने तिचे ते अश्रू मोत्याच्या मणीप्रमाणे चमकू लागली . एका हातात डायरी तर एका हातात पेन , मन भरून आले , डोक्यामध्ये हजारो प्रश्न रेंगाळत होती. बाल्कनीमध्ये बसल्यामुळे पावसाच्या सरी तिला स्पर्श करू बघत होत्या , हवेचे गार झुळूक तिला धक्का मारून आपली वाट काढत होते , क्षणार्थात मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला . नाही म्हणता म्हणता तिचे अश्रू अनावर झालेत आणि ती हळूहळू हुंदके देत ती डायरी वाचू लागली . जुनी डायरी आणि...... तिचे प्रेम याचे combination म्हणजे तिचे लिखाण आणि त्याची शब्द . आवडत नव्हते तिला लिहायला मात्र त्याच्यामुळे ती लिहायला लागली होती .गाणी ,कविता , चारोळी , शायरी हे सगळे त्याच्याकडून ती शिकली होती . भावना व्यक्त करू लागली होती . डायरीचे पाने ती एकापाठोपाठ वाचू लागली......."आज त्याच...

भुरळ...

विरहाचे लिहायला मला कधी जमलेच नाही... तू आयुष्यात नसणे मला कधी पटलेच नाही ...... तुझ्यामुळे पडलेली भुरळ कशी बरे विसरेल मी..... सात रंगाने रंगलेले आयुष्य माझे कसे बरे पुसेल मी....

आप्पाजीचा कामठा

Image
                                बऱ्याच दिवसांपासून माझे नि दादाचे आमच्या लहानपणाच्या विषयांवर गप्पा रंगत होत्या . आम्ही कसे होतो किंवा आम्ही काय काय खोडकरपणा केला , हे आईपण मधे मधे सांगू लागली .खरं तर त्या गोष्टी ऐकून ते चित्र डोळ्यासमोर येऊन थबकले . आणि लगेच आपण ह्या गोष्टी लिहाव्या आणि परत जुन्या आठवणींना उजाळा द्यावा असे कुठे तरी मनात वाटले . आणि आठवला आप्पाजी चा कामठा (काम करण्याची खोली त्याला आम्ही कामठा असे म्हणत असे) . हा कामठा आम्हा भावंडासाठी तिजोरी होती आणि त्या तिजोरीचे मालक होते स्वतः आमचे आप्पाजी. खाऊसाठी पैसे आईकडून मिळायचे नाही तेव्हा आमच्यासाठी तो शेवटचा पर्याय असायचा कामठा आणि तिथून आम्ही कधी निराश होऊन बाहेर पडलो नाही किंवा तशी वेळ आम्ही आणली नाही . कारण पैसे आम्ही घेणार म्हणजे घेणारच हट्टीपणा (आता तो हट्टीपणा नाहीये) शेवटी , म्हणून आप्पाजीही  वैतागून आम्हाला पैसे देत असे . आप्पाजींची एक खुबी म्हणजे आम्हा चौघांमधले गोड व्यवहार हे आईला कळायचे नाही , त्याची आप्पाजी...

चित्र तुझे ......

चित्र रेखाटले तुझे आज माझ्या मनातले जोडले मी सात जन्मी ऋणानु बंधनात रे कसला हा खेळ सारा ध्यास तुझा लागला हळवे झाले मन हे माझे आसुसले भेटाया तुला 

ओळख......

वाटले लिहावे आज फक्त तुझ्यासाठी मांडावी प्रेम कहाणी तुझ्या-माझ्यातली..... नव्याने झाली होती आपली ती ओळख नकळत रचल्या गेली कहाणी आपल्या प्रेमाची ....

अव्यक्त झालेले प्रेम ....शेवटचा भाग

Image
                           पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार असे वातावरण झाले होते . या सोनेरी पावसात ह्या दोघांचे प्रेम जोमाने फुलत होते . पण कुठे तरी कमीपणा होता कारण यांच्या आयुष्यात आलेली त्याची ती , त्यामुळे दोघे हि थोडे मागेपुढे करत होते . एकीकडे पावसाने अख्ख्या परिसरावर राज्य गाजवले होते नि दुसरीकडे  यांच्या प्रेमाला नव्याने पालवी फुटू लागली होती  . बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आज कदाचित मला उशीर होईल , असे मनात फुटफूट तो कॉलेजची तयारी करू लागला . तो -  आज तिला सगळे काही सांगून मोकळा होतो , कारण माझं आयुष्य आता तिच्या बरोबर मला काढायचे आहे , पण ..... पण गार्गी चे काय ? (गार्गी हि त्याची ex gf ) हळूच श्वास रोखुन , पण मी का तिचा विचार करून ना , ती मला सॊडून गेली होती मी नाही . आज ती परत आली तर मी का माझं खरं प्रेम सोडू , आणि गार्गी वर माझं खर प्रेम असत तर स्वराचा नि माझा काहीच संबंध नसता. हे देवा ....!  डोक्याचा भुगा होण्याची वेळ आलीये आता माझ्यावर . असाच विचार करत करत त्याने आप...